CM Bhagwant Mann esakal
देश

विधानसभेत अग्निपथ योजनेविरोधात ठराव आणणार; मुख्यमंत्री मान यांची मोठी घोषणा

सकाळ डिजिटल टीम

'17 वर्षांची मूलं सैन्यात भरती होऊन 21 व्या वर्षी माजी सैनिक होतील, हे दुःखदायक आहे.'

चंदीगढ : पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (CM Bhagwant Mann) यांनी केंद्र सरकारनं (Central Government) सुरु केलेल्या नवीन अग्निपथ योजनेचा (Agneepath Scheme) निषेध नोंदवलाय. या योजनेविरोधात विधानसभेत (Punjab Assembly) ठराव आणला जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलंय. विरोधी पक्षनेते प्रताप सिंह बाजवा यांनी अग्निपथ योजनेबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सीएम मान यांनी ही माहिती दिलीय.

हा प्रस्ताव सर्वसहमतीनं आणणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. आपण अग्निपथ योजनेच्या विरोधात असल्याचं मुख्यमंत्री मान म्हणाले. 17 वर्षांची मूलं सैन्यात भरती होऊन 21 व्या वर्षी माजी सैनिक होतील, हे खूप दुःखदायक आहे. या वयात त्यांचं लग्नही झालं नसेल. शिवाय, लष्करातून बाहेर पडल्यानंतर कॅन्टीनमधून साहित्य नेण्याची सुविधाही त्यांना घेता येणार नाहीय.

ते पुढं म्हणाले, तरुण वयाच्या 35 व्या वर्षापर्यंत कठोर परिश्रम करून सैन्यात भरती होतात, तर नवीन योजनेनुसार त्यांना एवढ्या मेहनतीनंतर 4 वर्षांनीच सैन्यातून माघार घ्यावी लागणार आहे. मुख्यमंत्र्यांसमोर विरोधी पक्षनेते प्रताप बाजवा यांनीही अग्निपथ योजनेच्या विरोधात सर्व राजकीय पक्षांनी एकमत व्हायला हवं, असं सांगितलं. त्याविरोधात विधानसभेत एकमतानं ठराव करावा. मात्र, भाजप आमदार अश्वनी शर्मा यांनी त्याला विरोध केलाय. ही योजना तरुणांच्या हिताची असल्याचं ते म्हणाले.

अग्निपथ योजनेत 4 वर्षांची भरती

अग्निपथ योजनेंतर्गत अग्निवीरांची सैन्यात 4 वर्षांसाठी भरती केली जाईल. पहिल्या वर्षी त्यांना दरमहा सुमारे 30,000 रुपये पगार मिळेल. मग त्यात दरवर्षी 10 टक्क्यांनी वाढ होईल, म्हणजेच त्यांचा पगार दुसऱ्या वर्षी 33,000, तिसऱ्या वर्षी 36,500 आणि चौथ्या वर्षी 40,000 रुपये होईल. दरम्यान, त्यांच्या पगारातील सुमारे 30% रक्कम सेवा निधी निधीसाठी दरमहा कापली जाईल. सेवेच्या शेवटी म्हणजेच 4 वर्षानंतर, सरकार प्रत्येक अग्निवीरला एकूण 11.77 लाख रुपयांपर्यंतची रक्कम देईल. चार वर्षांनंतर, सुमारे 25 टक्के अग्निवीरांना पुढील सेवेसाठी कायम केलं जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain: महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा कहर! मुख्यमंत्री फडणवीसांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन; दिला सतर्कतेचा इशारा

Nagpur Vidhan Bhavan Project: नागपूर विधानभवनाचे रूपडे पालटणार; १,००० कोटींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प, दोन्ही सभागृह येणार एकाच छताखाली

Latest Marathi Live Update : लोणावळ्या कडे जाणाऱ्या रोडवर दरड कोसळली, कातळ धबधबा शेजारची घटना

Maharashtra Rain: पालघरमध्ये मुसळधार! 24 तासांत 134 मिमी पाऊस, जनजीवन विस्कळीत; वाहतूक ठप्प

Navi Mumbai: बटाटावड्यात आढळली अळी, नवी मुंबई महापालिकेच्या भोजनालयातील प्रकार

SCROLL FOR NEXT