punjab crime 
देश

'पवित्र ग्रंथ गुरु साहिब'ची पानं गुरुद्वारात घुसून फाडली! जमावाच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Punjab Man Beaten To Death : पंजाबमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका १९ वर्षीय तरुणाची गुरुद्वारामध्ये हत्या करण्यात आली आहे.

कार्तिक पुजारी

चंदीगड- पंजाबमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका १९ वर्षीय तरुणाची गुरुद्वारामध्ये हत्या करण्यात आली आहे. आरोप आहे की, तरुणाने 'पवित्र ग्रंथ गुरु साहिब'चे पानं फाडली होती. तरुणाने हे कृत्य का केलं हे समजू शकलेलं नाही. 'लाईव्ह हिंदूस्तान'ने यासंदर्भातील वृत्त दिलं. (Alleged tore some pages of the Guru Granth Sahib)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिरोजपूरच्या बंडाला गावात ही घटना घडली आहे. या घटनेनंतर संतापलेल्या जमावाने तरुणाला बेदम मारहाण केली. यामध्ये तरुणाचा मृत्यू झाला आहे. मृत तरुणाचे नाव बख्शीश सिंग असं असून तो तल्ली गुलाम गावाचा रहिवाशी आहे. गुरुद्धारामध्ये घुसून त्याने पवित्र ग्रंथाची पानं फाडली. तो पळून जाण्याचा प्रयत्न करत होता, त्यावेळी त्याला गुरुद्वारातील लोकांनी पकडलं.

घटनेची माहिती मिळताच आजूबाजूच्या परिसरातील अनेक लोक गुरुद्वारामध्ये गोळा झाले होते. तसेच पोलीस देखील घटनास्थळी पोहोचले होते. श्री गुरु ग्रंथ साहिब सतकार कमेटीचे अध्यक्ष लखवीर सिंग यांनी बख्शीशच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. बख्शीश पळून जाण्याचा प्रयत्न करत होतो, त्यामुळे संतापलेल्या जमावाने त्याला मारहाण सुरु केली होती.

दूसरीकडे, बख्शीश सिंह याच्या वडिलांनी वेगळा दावा केला आहे. ते म्हणालेत की, 'माझ्या मुलाची मानसिक स्थिती ठीक नाही. त्यामुळे त्याच्यावर उपचार देखील सुरु होते.' मुलाच्या मृत्यूनंतर वडील लखविंदर सिंग यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

माहितीनुसार, जमावाच्या मारहाणीमध्ये बख्शीश सिंग जमिनीवर पडला होता. त्यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आले होते. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात लोकांविरोधात तक्रार दाखल केली आहे. मृत तरुणाची मानसिक स्थिती ठीक नव्हती. तो दोन महिन्यांपूर्वी दिल्लीला पळून गेला होता. घरच्यांनी त्याला परत आणलं होतं असं कळतंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुणेकरांनो, इंधन तुटवडा नाही, गर्दी करू नका! पेट्रोल डीलर्स असोसिएशनचं आवाहन; राज्य सरकारनेही खरेदीबाबत दिले मोठे अपडेट

Railway News: भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय! रेल्वे ट्रॅकखाली १२ तासांत सबवे उभारणार; ग्रामीण भागासाठी ‘गेमचेंजर’ योजना

मी शंकर, तू माझी पार्वती! स्वयंघोषित धर्मगुरूचा पुण्यातील ३५ वर्षीय महिलेवर अत्याचार; पीडितेचे गंभीर आरोप

Gas Cylinder Shortage : हॉटेलांसह अनेक चहा-वडापाव स्टॉलही बंद; व्यावसायिक सिलिंडर पुरवठा ठप्प, लहान-मोठ्या खाद्य व्यवसायांची कोंडी

Sangola Crime : हरवलेल्या १०० महिलांचा लावला शोध; सांगोला पोलिसांची कामगिरी, दहा मुली कुटुंबीयांच्या स्वाधीन

SCROLL FOR NEXT