PNB Sakal
देश

पंजाब नॅशनल बॅंकेत खाते आहे? जाणून घ्या PNB चे नवे नियम

पंजाब नॅशनल बँकेने १५ जानेवारीपासून ग्राहकांना सेवाशुल्कात २५ ते ५० टक्के वाढ केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पंजाब नॅशनल बँकेने (Punjab National Bank) १५ जानेवारीपासून ग्राहकांना सेवाशुल्कात २५ ते ५० टक्के वाढ केली आहे. तसेच, मोठ्या शहरांमध्ये खात्यात किमान शिल्लक रक्कम आत्ता दुप्पट ठेवण्याचे बंधन घातले आहे. त्यामुळे पुणे-मुंबईसारख्या शहरात खात्यात किमान दहा हजार रुपये ठेवणे आवश्यक आहे. तसे न केल्यास सहाशे रुपयांचा दंड ठोठावला जाणार आहे. (Punjab National Bank New Rule)

विवेक वेलणकर यांनी बॅंकेकडून माहिती अधिकारात माहिती घेतली. त्यानुसार, २०१६-१७ ते २०२०-२१ या फक्त पाच वर्षांत पंजाब नॅशनल बँकेने शंभर कोटींच्यावर कर्ज थकबाकी असणाऱ्या १४८ थकबाकीदारांची ४६ हजार १२५ कोटी रुपयांची कर्जे निर्लेखित केली आहेत. त्यापैकी चार हजार ५१६ (सुमारे दहा टक्के) कोटींची वसुली बॅंक करू शकली आहे.

पंजाब नॅशनल बँकेचे हे किमान शिल्लक परिपत्रक रिझर्व्ह बँकेने २०१४ साली काढलेल्या परिपत्रकाच्या पूर्णपणे विरोधात असून, बेकायदेशीर आहे. रिझर्व्ह बॅंकेच्या परिपत्रकानुसार बॅंकेला खात्यात किमान शिल्लक नसल्यास निश्चित दंड लावता येत नाही. तर, दंडाच्या रकमेचे स्लॅब करावे लागतात आणि किमान शिलकीच्या रकमेच्या नियमापेक्षा जितकी रक्कम कमी पडली त्या प्रमाणातच दंड आकारता येतो. त्यासाठी ग्राहकाला खात्यात शिल्लक कमी झाल्याचे कळविणे गरजेचे आहे, असे वेलणकर यांनी निवेदनात नमूद केले आहे.

मोठ्या कर्जदारांची थकीत कर्जे वसूल करण्यात अपयश आलेली बॅंक आता ग्राहकांच्या खिशात हात घालून दात कोरून पोट भरायला बघते आहे. बेकायदेशीर परिपत्रक काढून ग्राहकांना लुटू पाहणाऱ्या पंजाब नॅशनल बँकेला ग्राहकांनी संघटितपणे धडा शिकवण्याची वेळ आली आहे. अन्यथा उर्वरित राष्ट्रीयकृत बॅंका पंजाब नॅशनल बँकेचा कित्ता गिरविण्याची शक्यता आहे.

- विवेक वेलणकर, अध्यक्ष, सजग नागरिक मंच

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Heavy Rain Alert: विदर्भासाठी अलर्ट! जोरदार पावसाचा इशारा; राज्यातल्या 'या' भागात मुसळधार बरसणार

Manish Kashyap : भाजपला सोडचिठ्ठी दिलेल्या प्रसिद्ध युट्यूबर मनीष कश्यपने सुरू केली नवी राजकीय इनिंग!

Latest Maharashtra News Updates : शित्तूर -आरळा व चरण -सोंडोली पुलावर सुरक्षिततेसाठी कोकरूड पोलिसांनी लावले बॅरिकेट

Trapit Bansal: भारतीय तरुणाचा जगभरात डंका! IITian त्रपित बंसलला Meta कडून अब्जावधींची ऑफर; सॅलरी ऐकून व्हाल थक्क

Pune News : पुणे बाजार समितीच्या दिलीप काळभोर यांचा सभापतीपदाचा राजीनामा

SCROLL FOR NEXT