Amritpal Singh
Amritpal Singh 
देश

Amritpal Singh: २३ दिवसांनी पोलिसांना मोठे यश, अमृतपालचा राईट हॅन्ड ताब्यात!

Sandip Kapde

खलिस्तानी अमृतपाल सिंहच्या शोधात असलेल्चा पंजाब पोलिसांना २३ दिवसानंतर मोठे यश मिळाले आहे. अमृतपालच्या जवळच्या पप्पलप्रीतला पोलिसांनी अमृतसर ग्रामीणमधून अटक केली आहे. पप्पलप्रीत हा अमृतपालचा सल्लागार आहे. तो फरार झाल्यापासून अमृतपालसोबत सावलीसारखा राहत होता.

पंजाब पोलिसांनी १८ मार्च रोजी वारिस पंजाब दे संघटनेचा प्रमुख अमृतपाल सिंह आणि त्याच्या साथीदारांवर कारवाई केली होती. यावेळी पोलिसांनी त्यांचे शेकडो सहकारी आणि समर्थकांना अटक केली. मात्र, अमृतपाल त्याच्या जवळच्या काही जणांसह पळून जाण्यात यशस्वी झाला.

पप्पलप्रीतला पंजाब पोलिसांनी एका ऑपरेशनमध्ये अटक केली ज्यामध्ये गुप्तचर युनिटचाही सहभाग होता. पोलिसांनी सांगितले की पप्पलप्रीत अमृतपालचा गुरू मानला जातो आणि तो पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयच्या संपर्कात होता.

अमृतपालचा उजवा हात आहे पप्पलप्रीत-

पप्पलप्रीत सिंग हा अमृतपालचा मुख्य हस्तक आहे. पप्पलप्रीत अमृतपालचा माध्यम सल्लागार देखील आहेत. गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार पंजाबमध्ये खलिस्तानचे वातावरण निर्माण करण्यासाठी पप्पलप्रीत थेट आयएसआयच्या संपर्कात आहे. तो राज्यात दहशतवाद पसरवण्याचा कट रचत होता.

अमृतपाल १८ मार्चपासून फरार आहे-

पंजाब पोलिसांनी १८ मार्च रोजी खलिस्तान समर्थक आणि त्यांच्या साथीदारांवर कारवाई सुरू केल्यापासून अमृतपाल आणि पप्पलप्रीत फरार होता. अमृतपाल आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध समुदायांमध्ये शत्रुत्व वाढवणे, खुनाचा प्रयत्न, पोलिस कर्मचाऱ्यांवर हल्ला करणे आणि सरकारी अधिकाऱ्यांना कर्तव्य बजावण्यात अडथळा आणणे यासह विविध कलमांखाली एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DY Chandrachud: भारतातील न्यायालये लोकशाहीच्या चर्चेचे ठिकाण; ब्राझीलमधील J20 परिषदेत डी वाय चंद्रचूड यांचे स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update: घाटकोपर होर्डिंगखाली अजूनही 30-40 लोक अडकल्याची शक्यता; 46 तासानंतरही बचावकार्य सुरु

Vastu Tips: नवीन हॉटेल सुरू करताना कोणते नियम पाळावे, वाचा वास्तूशास्त्र काय सांगतं

Bank Fraud: कोण आहे धीरज वाधवान? ज्याने विजय मल्ल्या अन् नीरव मोदीपेक्षाही केलाय मोठा स्कॅम

Amit Shah: POK भारताचे आहे अन् आम्ही ते परत घेऊ; अमित शाह यांचा इशारा

SCROLL FOR NEXT