देश

पंजाब: मंत्रिमंडळात सहा नवे चेहरे; विस्तारात १५ जणांचा समावेश

सकाळ डिजिटल टीम

चंडीगड : पंजाबमधील चरणजितसिंग चन्नी मंत्रिमंडळाचा आज विस्तार करण्यात आला. त्यात सहा नव्या चेहऱ्यांसह १५ जणांचा समावेश करण्यात आला. पंजाबमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होत आहे. त्यापूर्वी काही महिने आधीच काँग्रेसने कॅप्टन अमरिंदरसिंग यांना पदावरून हटवून चरणजितसिंग चन्नी यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची सूत्रे सोपविली होती.

निवडणुका डोळ्यासमोर ठेवून रणदीपसिंग नभा, राजकुमार वेर्का, संगीतसिंग गिलझियान, परगट सिंग, अमरिंदरसिंग राजा वारंग आणि गुकरिरतसिंग कोटली या सहा नव्या चेहऱ्यांचा समावेश मंत्रिमंडळात करण्यात आला आहे. याशिवाय ब्रह्म मोहिंद्रा, मनप्रीतसिंग बादल, त्रिपत राजिंदरसिंग बाजवा, सुखबिंदरसिंग सरकारिया, राणा गुरजितसिंग, अरुणा चौधरी, रझिया सुल्ताना, भारत भूषण आशू व विजय इंदर सिंगला यांचा समावेश आहे.

मोहिंद्रा हे मंत्रिमंडळातील सर्वांत ज्येष्ठ सदस्य आहेत. अमरिंदरसिंग यांच्या मंत्रिमंडळातही ते मंत्री होते. कोटली हे माजी मुख्यमंत्री बेअंतसिंग यांचे नातू आहेत. त्यांच्यावर अपहरणाचा खटला चालला होता, त्यातून त्यांची सुटका झाली होती. त्यामुळे त्यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाला शिरोमणी अकाली दल आणि आम आदमी पार्टीने विरोध केला होता.
राणा गुरजितसिंग यांचा समावेश अमरिंदरसिंग यांच्या मंत्रिमंडळात होता. मात्र वाळू गैरव्यवहारात आरोप झाल्याने त्यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आले होते. ते पंजाबच्या श्रीमंत आमदारांपैकी एक आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

14 Years Absconding Motorbike Thief Arrested in Partur : पाचोड पोलिसांची धडक कारवाई; १४ वर्षांपासून फरार असलेल्या मोटारसायकल चोराला परतूरमधून जेरबंद

Supreme Court: बँक खात्यातून पैसे गेल्यास भरपाई करुन देण्याची जबाबदारी बँकेची! सर्वोच्च न्यायालयाने फटकारले

Latest Marathi News Update: डोळ्यात स्प्रे मारून ३० लाखांची रोकड लुटली

ABHISHEK SHARMA RECORD: अभिषेक शर्माच्या निशाण्यावर राहुल-हार्दिकचा विक्रम! चौथ्या T20 सामन्यात इतिहास घडवण्याची संधी

PCMC ACB raid on Chief Engineer : पिंपरी-चिंचवड महापालिकेत ACB ची मोठी कारवाई! थेट मुख्य अभियंत्यांच्या कार्यालयातच धाड; ठेकेदाराकडून लाच मागताना बड्या अधिकाऱ्याला बेड्या

SCROLL FOR NEXT