Siddhu Moosewala Shooters New Video esakal
देश

VIDEO : पंजाबी गायकाच्या हत्येनंतर मारेकऱ्यांचं जोरदार सेलिब्रेशन

सकाळ डिजिटल टीम

लोकप्रिय पंजाबी गायक, रॅपर आणि काँग्रेस नेता सिध्दू मूसेवालाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.

Siddhu Moosewala Shooters New Video : लोकप्रिय पंजाबी गायक, रॅपर आणि काँग्रेस नेता सिध्दू मूसेवाला यांची 29 मे रोजी गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. सिध्दू मूसेवाला हत्येशी संबंधित आणखी एक व्हिडिओ आता समोर आलाय. मूसेवालाची हत्या केल्यानंतर मारेकरी गाणं गात सेलिब्रेशन करतानाचा हा व्हिडिओ आहे.

या व्हिडिओत मूसवालाचे मारेकरी खूप सेलिब्रेशन करताना दिसताहेत. तसंच मस्तीत हे लोक हवेत शस्त्रेही फिरवत आहेत. एकीकडं पोलीस या हत्येशी संबंधित लोकांना अटक करत असतानाच या हत्येनंतरचा व्हिडिओ आरोपींचं मनोबल वाढवत आहे. हा व्हिडिओ मूसवालाच्या हत्येनंतरचा आहे. या हत्येनंतर एकीकडं पोलीस आरोपींचा शोध घेत होते, तर दुसरीकडं हे आरोपी पोलिसांच्या भीतीची पर्वा न करता व्हिडिओ बनवत होते.

मुसेवाला हत्येप्रकरणी दिल्ली पोलिसांनी सोमवारी आणखी दोघांना अटक केलीय. अंकित आणि सचिन भिवानी अशी या अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींची नावं आहेत. दरम्यान, व्हिडिओमध्ये आरोपी सिध्दू मुसेवालाला मारल्यानंतर मजा करत होता आणि पंजाबी गाण्यांवर हवेत हात फिरवत होता. त्यापैकी सोमवारी अटक करण्यात आलेले अंकित आणि प्रियवत हे देखील दिसत आहेत. पोलीस जेव्हा या शूटर्सचा शोध घेत होते, तेव्हा हे आरोपी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फरार होत होते. या लोकांनी जवळपास 35 ते 36 ठिकाणं बदलल्याचं दिल्ली पोलिसांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story: अंगणवाडी सेविका आईच्या Gen Z लेकाने बदलले कुटुंबाचे नशीब; UPSCत ५७४ वा क्रमांक मिळवत झाला IPS, सर्व भावूक

‘आराधी आलाय नवा ग नवा’ ऐश्वर्या नारकर अन् तितीक्षा तावडेंचा धमाकेदार डान्स, नेटकरी म्हणाले... ‘एक स्वामिनी तर दुसरी दामिनी…’ Video

Rajya Sabha Candidates: राज्यसभा निवडणुकीत भाजपचा सस्पेन्स संपला; दोन राज्यांत उमेदवारांची घोषणा, कोण आहेत चेहरे? एक तर अभिनेत्री

PM Kisan: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! पीएम किसानचा २४वा हप्ता कधी येणार? नवी अपडेट समोर

Prithviraj Chavan : ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा देऊन चालणार नाही, तर त्यांना...; पृथ्वीराज चव्हाणांचे घणाघाती आरोप, फौजदारी कारवाईचीही मागणी

SCROLL FOR NEXT