bhagwant mann government 
देश

Bhagwant Mann : पंजाब सरकार आणतय आरोग्यवर्धक दारू; सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्रही दाखल

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - पंजाबमधील अवैध दारूविरोधातील याचिकेत पंजाब सरकारने म्हटले की, विषारी दारूमुळे होणारे मृत्यू टाळण्यासाठी पंजाब सरकार "आरोग्यवर्धक" देशी दारू आणत आहे. याबाबत पंजाब सरकारच्या उत्पादन शुल्क विभागाने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्रही दाखल केले आहे. ( bhagwant mann government news in Marathi)

पंजाब सरकार लवकरच ४० टक्के अल्कोहोलचे प्रमाण असलेली देशी-निर्मित दारू अवैध घरगुती दारूला पर्याय म्हणून बाजारात आणणार आहे. विशेषत: ग्रामीण भागात विषारी दारूविक्री बंद करण्यासाठी हा उपाय योजला आहे.

सरकारकडून गावठी विषारी दारूपासून लोकांनी दूर राहावे, यासाठी दर्जेदार दारू देण्यात येणार आहे. स्वस्त देशी दारूचे उत्पादन आणि विक्रीचे पाऊल हा पंजाब सरकारच्या नव्या उत्पादन शुल्क धोरणाचाच एक भाग आहे. राज्य सरकारने सध्याच्या उत्पादन शुल्क धोरणानुसार 40-डिग्री स्ट्रेंथ अल्कोहोल असलेली स्वस्त दारु आणली आहे. ही दारू अवैध दारू विक्रीला आरोग्यदायी पर्याय ठरणार आहे.

हेही वाचा काय आहे सलाम किंवा कुर्निसाताचे महत्त्व राजशिष्टाचारांमध्ये

फिल्ड अधिकाऱ्याना स्थानिक पातळीवरील माहितीच्या आधारे ४० टक्के डिग्री स्ट्रेंथ दारुच्या आवश्यकतेनुसार पुरवठा करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. जेणेकरून अवैध दारू विक्री होत असलेल्या परिसरात सरकारची आरोग्यदायी दारू उपलब्ध करून देता येईल.

तस्करी, अवैध दारू निर्मितीवर कारवाई व्हावी, यासाठी सर्व क्षेत्रिय घटकांना परिपत्रके देण्यात आली आहेत. उत्पादन शुल्क विभागाच्या या प्रतिज्ञापत्रात म्हटलं की, सरकार अवैध दारू विक्रीला सरकारच्या देशी दारूच्या माध्यमातून स्वस्त पर्याय देत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : ‘असे दादा पुन्हा होणे नाही, मिळणे नाही’; अजित पवार यांच्या जाण्याने मावळातील पदाधिकारी, कार्यकर्ते निःशब्द

Plane Fire Video : थोडक्यात बचावले नासाचे वैमानिक! लँडिंगदरम्यान विमानाला लागली आग, धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

Ajit Pawar : मासवडीच्या चवीतून मिळालेली प्रेरणा…; अजितदादांच्या त्या भेटीच्या आठवणींनी आंबेगाव तालुक्यातील महिलांना अश्रू अनावर

Ajit Pawar : अजितदादा पंचतत्वात विलीन; पुत्र पार्थ आणि जय यांनी दिला मुखाग्नी

Latest Marathi News Live Update : केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारमण यांनी लोकसभामध्ये आर्थिक सर्वेक्षण 2025–26 सादर केले

SCROLL FOR NEXT