Vande Bharat
Vande Bharat esakal
देश

Vande Bharat : वंदे भारत ट्रेनला पुन्हा अपघात; काचा फुटल्या, रेल्वे दोन तास जागेवरच

सकाळ डिजिटल टीम

Vande Bharat : ओडिसामध्ये रविवारी झालेल्या जोरदार वादळामुळे वंदे भारत एक्स्प्रेसच्या काही डब्यांच्या खिडक्यांचे नुकसान झाले आहे. पुरी-हावडा या गाडीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

नुकतंच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवला. रविवारी दुपारी ही गाडी भद्रक रेल्वे स्थानकापासून ३० किलोमीटर अंतरावर जोरदार वादळ आणि गारपीट सुरु झाली. त्यामुळे गाडीच्या खिडक्यांचे नुकसान झाले असून रेल्वे इंजिनच्या विंडस्क्रीनचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

ही वंदे भारत एक्स्प्रेस पुरीहून हावडा येथे जात असतांना गारपीटीचा तडाखा बसला त्यामुळे चालकाच्या केबिनच्या काचा फुटल्या. विशेष म्हणजे एक झाड उन्मळून पडल्याने ओव्हरहेड इलेक्ट्रिक वायरचेही नुकसान झालेले आहे. त्यामुळे बैतरणी ओव्हब्रिजवर ही गाडी दोन तास अडकून पडली होती.

रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी ट्रेनमध्ये असलेले २५० प्रवासी सुरक्षित असल्याचं सांगितलं होतं. तातडीने एक डिझेल इंजिन ट्रॅक मोकळा करण्यासाठी दाखल झालं होतं. येत्या काही दिवसांमध्ये राजधानी दिल्ली ते डेहराडून, गुवाहाटी ते न्यू जलपाई या मार्गांवर वंदे भारत ट्रेन धावणार आहे. मात्र या ट्रेनच्या अपघातांमुळे आणि होणाऱ्या नुकसानीमुळे कायम चर्चा होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काँग्रेसला मोठा धक्का! दिल्ली काँग्रेस प्रदेशाध्यक्षाने दिला पदाचा राजीनामा, सांगितलं कारण

IPL 2024: राजस्थानची प्लेऑफच्या दिशेने घौडदौड, तर मुंबईच्या अडचणी वाढल्या; जाणून घ्या पाँइंट्स - टेबलची स्थिती

Crime News: सलमान खान गोळीबार प्रकरणी दोघांना ३० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

Sankarshan Karhale: "उद्धव ठाकरेंचा फोन आला अन् राज ठाकरेंनी घरी बोलवलं"; राजकारणावरील कविता सादर केल्यानंतर काय-काय झालं? संकर्षणनं सांगितलं

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान मोदींची उद्या पुण्यात सभा; सुमारे दोन लाख नागरिक उपस्‍थित राहणार

SCROLL FOR NEXT