Sambit Patra sakal
देश

Sambit Patra : संबित पात्रांच्या विधानाचे पडसाद मतपेटीवर?

ओडिशात भाजपच्या कामगिरीवर परिणाम होण्याची शक्यता.

स्मृती सागरिका कानुनगो

भुवनेश्‍वर - भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि पुरी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार संबित पात्रा यांनी ‘भगवान जगन्नाथ देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भक्त आहेत’ असे वक्तव्य केल्याने ओडिशात राजकीय वाद निर्माण झाला आहे.

भगवान जगन्नाथाबद्दल बोलताना चुकून विधान केल्याचा पश्चात्ताप म्हणून पात्रा यांनी तीन दिवस उपवास करण्याचीही घोषणा केली. मात्र या विधानाचे पडसाद लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या उर्वरित दोन टप्प्यांमधील मतदानावर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात असून भाजपच्या कामगिरीवर होऊ शकतो.

पात्रा यांच्या विधानावर विरोधी पक्ष आणि धार्मिक नेत्यांनी समाचार घेतला आहे. राजकारण आणि धर्माची सरमिसळ करण्यास विरोध असणाऱ्या मतदारांची याबाबतची प्रतिक्रिया मतदानातून उमटू शकते, असे मत राजकीय विश्लेषक व्यक्त करीत आहेत. ओडिशात भाजपला मर्यादित पाठिंबा मिळतो.

या राज्यात पाय रोवण्याचा अटोकाट प्रयत्न पक्ष करीत असला तरी जगन्नाथाचे कट्टर भक्त असलेल्या मतदारांच्या रोषाने त्यावर पाणी फिरू शकते.

पात्रा यांच्या भाषणातील जगन्नाथासंबंधीच्या मुद्द्याचा केवळ पुरीतील मतदानावरच नाही तर राज्यभरातील इतर मतदारसंघांवरही त्याचा परिणाम होईल, असा अंदाज राजकीय तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.

माफीनंतर विषय संपला

पात्रा यांच्या विधानाबद्दल विचारले असता पुजारी सिमांता पांडा म्हणाले, की त्यांनी हे जाणीवपूर्वक केले नाही. कधीकधी जीभ घसरू शकते. पात्रा यांनी याबद्दल माफी मागितली असून हा विषय आता संपला आहे. लोकसभा निवडणुकीसाठी मी पात्रा आणि मोदींना मतदान करेन.’’

पात्रांची संपर्कयंत्रणा बळकट

पुरीतून मतदारसंघातून २०१९ मध्ये पात्रा यांना ‘बीजेडी’चे पिनाकी मिश्रा यांच्याकडून केवळ ११ हजार ७१४ मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता. यंदा पात्रा यांचा सामना बिजू जनता दलाचे (बीजेडी) अरुप पटनाईक यांच्याशी आहे. पटनाईक हे निवृत्त आयपीएस अधिकारी असून मुंबईचे माजी पोलिस आयुक्त आहेत. या मतदारसंघात पात्रा यांचे संघटन मजबूत आहे. दोन वर्षांपूर्वी सुरू केलेल्या संपर्क मोहिमेमुळे यंदा भाजपला येथून विजयाची आशा आहे. गेल्या वेळी त्यांचा पराभव झाला तरी मतदारसंघात ते कायम सक्रिय असल्याचे तेथील नागरिक सांगतात. ‘‘पात्रा लोकांना कायम भेटत असतात, ख्यालीखुशाली विचारतात. ते पूर्वी निवडणूक हरले तरी मंदिरातील लोकांशी त्यांचा संपर्क कधीही तुटला नाही. लोकांना मदत करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो,’’ असे मंदिराजवळ हॉटेल चालवणारे प्रफुल्ल साहू म्हणाले. राज्यात ‘बीजेडी’ आणि केंद्रात भाजप सत्तेवर असावा, असे इतर अनेकांप्रमाणे साहू यांचे मत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cyber Scam: ‘वॉटर बिल अपडेट करा अन्यथा पाणी बंद’ अशा धमकीने; उद्योजकाला ५४ लाखांचा गंडा

CM Devendra Fadnavis: रस्ता रुंदीकरणाला पाठिंबा; मुख्यमंत्री फडणवीस; गरज असेल तिथे भूसंपादन

Illegal Sand Mining: सुखना नदीतून वाळू उपसा करणारे जेरबंद; पाचजणांवर गुन्हा; पाच ट्रॅक्टरसह तीस लाखांचा मुद्देमाल जप्त

Manmad News : इंदूर-पुणे महामार्गावर कंटेनर अपघात; मनमाडजवळ वाहतुकीचा खोळंबा, प्रवाशांचे हाल

Latest Marathi News Updates : पालकमंत्री अतुल सावे यांची गाडी गावकऱ्यांनी अडवली

SCROLL FOR NEXT