Russian President Vladimir Putin to visit Delhi amid escalating India-US trade tensions, marking a crucial moment in India-Russia diplomatic ties.  esakal
देश

Putin Visit to India: भारत-अमेरिका 'ट्रेड वॉर' सुरू असताना, चार वर्षानंतर आता रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन येताय दिल्लीत!

Russian President Putin visit to Delhi: राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी दिली माहिती; जाणून घ्या, कधी असणार आहे पुतीन यांचा भारत दौरा?

Mayur Ratnaparkhe

Russian President Putin plans high-level visit to Delhi: भारत आणि रशिया यांच्यातील व्यावहारिक संबंधांमुळे, एककीडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारतावर नाराज आहेत, त्यांनी भारतावर एकूण ५० टक्के टॅरिफ लावलेला आहे. असे असताना आता ट्रम्प यांना झोंबणारी बातमी समोर आली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे लवकरच भारत दौऱ्यावर येणार आहेत.

 भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी पुतीन यांच्या भारत दौऱ्याच्या कार्यक्रमाची पुष्टी केली आहे. पंतप्रधान मोदींनी पुतीन यांना भारत भेटीचे आमंत्रण दिले होते. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल म्हणाले की पुतिन यांच्या भारत भेटीबद्दल ते खूप उत्सुक आहेत. अजित डोवाल यांनी गुरुवारी मॉस्कोमध्ये ही घोषणा केली.

मॉस्को दौऱ्यावर गेलेले राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल म्हणाले की, भारत आणि रशिया एकमेकांचे धोरणात्मक भागीदार आहेत. या भेटीमुळे दोन्ही देशांमधील ही भागीदारी अधिक दृढ होईल. तर अमेरिका आणि भारतामध्ये ट्रेड वॉर सुरू असताना, दुसरीकडे पुतीन हे नवी दिल्लीला भेट देतील. अशा परिस्थितीत भारत आणि रशिया एकत्रितपणे अमेरिकेशी सामना करण्यासाठी रणनीती बनवू शकतात, असाही अंदाज वर्तवला जात आहे.

अजित डोवाल म्हणाले की राष्ट्राध्यक्ष पुतीन या वर्षाच्या अखेरीस भारतात येणार आहेत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष अशा वेळी भारतात येत आहेत, जेव्हा अमेरिकेने रशियाकडून तेल खरेदी करण्यावरून निराश झाल्यामुळे भारतावर ५० टक्के कर लादला आहे. त्यामुळे पुतीन यांचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

खरंतर रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन वर्ष २००० पासून अनेक वेळा भारत दौऱ्यावर आले होते. मात्र त्यांचा शेवटचा दौरा हा डिसेंबर २०२१ मध्ये झाला होता. ते २१ व्या भारत-रशिया शिखर परिषदेला उपस्थित राहण्यासाठी आले होते. यादरम्यान त्यांनी नवी दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट घेतली आणि अनेक महत्त्वाचे करार केले होते. त्यानंतर २०२२ पासून सुरू झालेल्या रशिया-युक्रेन युद्धानंतर राष्ट्राध्यक्ष पुतिन भारतात येऊ शकले नाहीत. अशा परिस्थितीत ते आता चार वर्षांनी भारतात येणार आहेत. यावेळी पुतीन २३ व्या भारत-रशिया शिखर परिषदेत सहभागी होतील.

पंतप्रधान मोदींच्या ११ वर्षांच्या कार्यकाळात पुतिन भारत दौऱ्यावर येण्याची ही सहावी वेळ असेल. यापूर्वी त्यांनी डिसेंबर २०१४, २०१५, २०१६, २०१८ आणि २०२१ मध्ये भारत दौरा केला आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladakh : खऱ्या रँचोसाठी भाजपचं ऑफिस जाळलं! लेहमध्ये सोनम वांगचूक यांच्या समर्थनार्थ आंदोलनाला हिंसक वळण

Fact Check : भारताने २००७ चा T20I वर्ल्ड कप जिंकला; पाकिस्तानींचा पारा चढला, Shahid Afridi ला केली होती मारहाण? Viral Video

Shahi Dussehra Reels : कोल्हापूरच्या शाही दसऱ्याचे रील्स, युट्यूब शॉर्ट्स बनवा अन् हजारो कमवा, प्रशासनाचा उपक्रम; जाणून घ्या नियम

Video: चिमुकला रेलिंगवरून खाली डोकावत होता, तेवढ्यातच तोल गेला अन्...; व्हायरल व्हिडिओ पाहून बसेल धक्का

'मला डॉक्टर व्हायचं नाही', MBBS प्रवेशाच्या आदल्या दिवशी संपवलं जीवन, NEET परीक्षेत ९९ टक्के

SCROLL FOR NEXT