UP Rabies News eSakal
देश

UP Rabies News : चिमुरडीचा रेबीजमुळे मृत्यू, मरण्यापूर्वी ४० जणांचा घेतला चावा; गावात दहशतीचं वातावरण

या मुलीला डॉक्टरकडे नेण्याऐवजी भोंदू बाबाकडे नेलं होतं असा आरोप गावकऱ्यांनी केला आहे..

Sudesh

उत्तर प्रदेशच्या जालौन जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याठिकाणी एका लहान मुलीचा रेबीजमुळे मृत्यू झाला. मात्र, मरण्यापूर्वी या मुलीने गावातील सुमारे ४० जणांचा चावा घेतला होता. यामुळे आता संपूर्ण गावात दहशत पसरली आहे.

मुलीवर उपचार टाळले

क्योलारी या गावामध्ये हा प्रकार समोर आला आहे. याठिकाणी राहणाऱ्या मंगल कुशवाहा यांची अडीच वर्षांची मुलगी आपल्या मामाच्या गावी, हिडोखरा येथे गेली होती. याठिकाणी या एका भटक्या कुत्र्याने या मुलीचा चावा घेतला होता. याकडे तिथे कोणीही लक्ष दिलं नाही.

यानंतर ही मुलगी आपल्या घरी परत आली होती. दोनच दिवसांमध्ये तिच्यामध्ये रेबीजची लक्षणं दिसू लागली. यामुळे या मुलीने गावामधील सुमारे ४० हून अधिक नागरिकांचा चावा घेतला. याममध्ये तिच्या घरातील व्यक्तींचाही समावेश होता.

एक दिवस खेळता खेळता ही मुलगी चक्कर येऊन पडल्यामुळे तिला जिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं. तिथून तिला झाँसीला रेफर करण्यात आलं. याठिकाणी उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला.

या मुलीला आधी एखाद्या डॉक्टरकडे नेण्याऐवजी भोंदूबाबाकडे नेण्यात आलं होतं. यामुळेच तिच्यातील संसर्ग अधिक पसरला असा आरोप काही गावकऱ्यांनी केला आहे. तसंच, या मुलीला चावल्यानंतर काही दिवसांमध्येच या कुत्र्याचाही मृत्यू झाल्याचं हिडोखरा गावातील लोकांनी सांगितलं.

नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

या घटनेमुळे दोन्ही गावातील नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. ज्यांना ज्यांना या मुलीने चावलं किंवा नखांनी ओरबाडलं होतं, ते सर्व लोक रेबीजची लस घेण्यासाठी दवाखान्यात जात आहेत.

चिंतेचं कारण नाही

दरम्यान जालौनचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. एनडी शर्मा यांनी सांगितलं, की मानवाच्या चावण्यामुळे रेबीजचा प्रसार होत नाही. केवळ जनावरांच्या चाव्यातून याचा संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. तसंच, आपल्याकडे पुरेशा रेबीज लसी उपलब्ध असल्याचंही शर्मा यांनी यावेळी स्पष्ट केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

HSC result 2026 Maharashtra : बारावीचा निकाल 2 मे रोजी, 'या' लिंकवर निकाल पाहता येणार

Sunetra Pawar Banner in Pandharpur : 'माझा विठ्ठल...!' देवघरात अजितदादांची प्रतिमा, आता पंढरपूरच्या वेशीवर सुनेत्रा पवारांसाठी 'तो' बॅनर चर्चेत!

Mumbai Pune Expressway Traffic : वाहतूक कोंडीत अडकलेल्या वाहनांकडून टोल घेऊ नका, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सूचना

Who is Arshad Khan? मुंबई इंडियन्सने पहिली संधी दिली अन् तो आता गुजरात टायटन्ससाठी ठरतोय एक्स फॅक्टर; RCB लाही दिलाय त्रास

Central Railway: मध्य रेल्वेवर विशेष ब्लॉक, लोकल सेवा पूर्ण बंद राहणार, मेल गाड्यांनाही फटका बसणार; कधी आणि कुठे?

SCROLL FOR NEXT