Raghav Chadda esakal
देश

Raghav Chaddha : आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्डा राज्यसभेतून निलंबित ! कारण काय ?

सकाळ डिजिटल टीम

Raghav Chadda News : आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार राघव चढ्ढा यांना राज्यसभेतून निलंबित करण्यात आले आहे. विशेषाधिकार समितीचा निर्णय येईपर्यंत आपचे खासदार राघव चढ्ढा निलंबित असणार आहेत.

'आप'चे दुसरे खासदार संजय सिंह यांच्याही अडचणी कमी झालेल्या नाहीयेत. त्यांच्या निलंबनाची मुदतही वाढवण्यात आली आहे.

पाच खासदारांचा असा दावा आहे की, त्यांच्या संमतीशिवाय दिल्ली सेवा विधेयक निवड समितीकडे पाठवण्याच्या प्रस्तावावर त्यांच्या नावांचा उल्लेख करण्यात आला होता. हा प्रस्ताव आपचे खासदार राघव चढ्ढा यांनी मांडला. भाजपचे तीन खासदार, बीजेडी आणि एआयएडीएमकेचे एक खासदार आहेत ज्यांनी निषेध नोंदवला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली होती.

हा वाद चव्हाट्यावर येताच राज्यसभेच्या उपसभापतींनी याची चौकशी केली जाईल, असे आश्वासन दिले आहे. या पाच खासदारांमध्ये सस्मित पात्रा (बीजेडी), नरहरी अमीन (भाजप), सुधांशू त्रिवेदी (भाजप), नागालँडचे खासदार फांगनॉन कोन्याक (भाजप) आणि लोकसभेचे माजी उपसभापती थंबीदुराई यांचा समावेश आहे.

त्याचवेळी आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार राघव चढ्ढा यांनी आपल्यावर लावण्यात आलेले आरोप खोटे असल्याचे सांगितले आहे. विशेषाधिकार समितीने पाठवलेल्या नोटीसला उत्तर देऊ, असे राघव चढ्ढा यांनी सांगितले होते.

खासदार म्हणून आपली प्रतिमा खराब करणाऱ्या भाजपच्या डावपेचांचा मी पर्दाफाश करणार असल्याचे राघव म्हणाले. आम आदमी पक्षाने राघव चढ्ढा यांच्यावरील कारवाईला कट असल्याचे म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Supply: स्वयंपाकाच्या गॅसवर केंद्राचा मोठा निर्णय! २१ कंपन्यांसाठी LPG उत्पादनाचा कोटा निश्चित; केंद्राची नवी रणनीती

Nagpur Police Endlife: नागपूरमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षकाची साडीने गळफास घेऊन जीवन संपविले; पोलिस दलात खळबळ, कारणांचा तपास सुरू

Marathi News Live Updates : दिल्लीत २५ 'अटल कॅन्टीन्स'चे उद्घाटन; ५ रुपयांत मिळणार जेवण

Golden Pyramid of Fat Loss: फॅट लॉससाठी तज्ज्ञ का फॉलो करायला सांगतात ‘गोल्डन पिरॅमिड’ फॉर्म्युला? वजन कमी करण्याचा योग्य क्रम जाणून घ्या!

Amit Shah: सोनिया गांधींच्या 'त्या' कृतीवर अमित शाह संतापले! चित्तोडगडमधून साधला निशाणा; म्हणाले, देशाची माफी मागा...

SCROLL FOR NEXT