Raghav Chadha Esakal
देश

'पंजाबात भ्रष्टाचाराचे आरोप असणाऱ्या व्यक्तीची मुख्यमंत्रीपदी निवड'

काँग्रेस पक्ष आज दुभंगलेला पक्ष आहे त्याला विरोधाची गरज नाही.

सकाळ डिजिटल टीम

पंजाब: काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi)यांनी चरणजीत सिंह चन्नी (Charanjit Singh Channi)यांना काँग्रेसकडून मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून घोषित करताच आम आदमी पार्टीच्या नेत्यांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे. आम आदमी पार्टीचे (AAP) नेते राघव चढ्ढा (Raghav Chadha)यांनी काँग्रेसवर (Congress)कडाडून टीका केली आहे. 3 कोटी पंजाबची लोकसंख्या असताना काँग्रेसने भ्रष्टाचाराचे आरोप असणाऱ्या व्यक्तीची मुख्यमंत्रीपदी निवड केली असा निशाणा राहुल गांधी यांच्यावर लगावला आहे.

काँग्रेस पक्ष आज दुभंगलेला पक्ष आहे त्याला विरोधाची गरज नाही. 3 कोटी पंजाबी नागरीकापैकी काँग्रेसने भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या एका व्यक्तीची (पंजाब सीएम चन्नी) मुख्यमंत्रीपदी निवड केली हे अत्यंत खेदजनक आहे अशी टीका आम आदमी पार्टीचे नेते राघव चढ्ढा यांनी केली.

दिल्लीतील लोकांना पक्षाच्या महत्वाच्या पदांवर बसवण्यात आले आहे. पंजाबमधील लोकांना बाजूला करण्यात आले आहे. ४२ आमदारांचा पाठिंबा असतानाही पंजाबमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील जाखड यांना मुख्यमंत्री न केल्याबद्दल विरोधकांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला होता. यावेळी काँग्रेसने जाखड यांना केवळ हिंदू असल्यामुळे मुख्यमंत्री बनवले नाही. काँग्रेसने पंजाबचे धार्मिक आधारावर विभाजन करण्याचा प्रयत्न केला आहे. जाखड यांना दिलेली दुय्यम दर्जाची वागणूक दुर्दैवी आहे, असा आरोप राघव चढ्ढा यांनी केला होता. आता ही त्यांनी चरणजीत सिंह चन्नी यांना मुख्यमंत्री पदाची उमेदवार दिल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT