Rahul Gandhi and Narendra Modi टिम ई सकाळ
देश

बेरोजगार तरुणांचा आवाज ऐका, राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींना सल्ला

'त्यांना 'अग्निपथा'वर चालवून त्यांच्या संयमाची अग्निपरीक्षा घेऊ नये'

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : भारतीय संरक्षण दलांमध्ये चार वर्ष नोकरीसाठी अग्निपथ योजना आणण्यात आली आहे. या योजनेच्या विरोधात आज गुरुवारी (ता.१६) बिहारपासून सुरु झालेले आंदोलन हरियाणापर्यंत पोहोचले आहे. गुरुग्राम आणि पलवलमध्ये ही तरुण मंडळी आक्रमक झाले आहेत. पलवलमध्ये आंदोलनकर्त्यांनी पोलिसांवर दगडफेक केली आणि वाहनांची तोडफोड केल्यानंतर आग लावून पेटवून दिली आहे. (Rahul Gandhi Advise Prime Minister Narendra Modi To Listen Unemployed Youths)

गर्दीला पळवून लावण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करण्याचीही सूचना दिली गेली आहे. दुसरीकडे गुरुग्राममध्ये दिल्ली-जयपूर महामार्ग पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. दोन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहे. यावर काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी यांनी ट्विट करुन आपली प्रतिक्रिया दिली आहे.

ना कोणती रँक, ना कोणते पेन्शन, ना २ वर्षांपासून कोणतीही प्रत्यक्ष भर्ती, ना ४ वर्षानंतर स्थिर भविष्य, ना सरकारचे सैन्याविषयी सन्मान, अशी घणाघाती टीका गांधी यांनी नरेंद्र मोदी सरकारवर केली. देशातील बेरोजगार तरुणांचा आवाज ऐका, त्यांना 'अग्निपथा'वर चालवून त्यांच्या संयमाची अग्निपरीक्षा घेऊ नये, पंतप्रधानजी, असा सल्ला राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: घृणास्पद, आक्षेपार्ह आणि अश्लील कंटेंट; गडकरींची बदनामी करणाऱ्या पोस्ट हटवा, हायकोर्टाचे आदेश

अतिक अहमदच्या धाकट्या लेकासह दोघांचा अपघातात मृत्यू, तुरुंगातल्या भावाला भेटून परतताना दुर्घटना

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेत मोठा गैरप्रकार! अहिल्यानगरात ५२३ पुरुषांनी उचलले ७४.७५ लाख; वसुलीला सुरुवात

रवि किशन यांना लेकीनेच केलं ट्रोल; रिव्हाचा भन्नाट Reel पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही, Viral Video

Marathi News Live Updates : झाशीहून प्रयागराजला परतताना भीषण अपघात; अतीक अहमदचा धाकटा मुलगा अबान अहमदचा मृत्यू

SCROLL FOR NEXT