Rahul Gandhi 
देश

Rahul Gandhi: "अहंकारी राजा चिरडतोय जनतेचा आवाज" ; कुस्तीपटूंवरील कारवाईवरून राहुल गांधी आक्रमक!

Sandip Kapde

Rahul Gandhi : जंतर-मंतरवर सुरू असलेल्या कुस्तीपटूंच्या आंदोलंनाविरोधात पोलिसांनी कडक कारवाई केली आहे. दिल्ली पोलिसांनी जंतरमंतरहून नवीन संसद भवनाकडे कूच करणाऱ्या कुस्तीपटूंना ताब्यात घेतले. दिल्ली पोलिसांनी जंतरमंतरवरील कुस्तीपटूंचा तंबूही हटवला आहे. याबाबत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे.

राहुल गांधी म्हणाले, "राज्याभिषेक पूर्ण, अहंकारी राजा रस्त्यावर जनतेचा आवाज चिरडत आहे"

राहुल गांधी यांनी नाव न घेता नरेंद्र मोदी यांच्यावर निशाना साधला आहे. देशाच्या नव्या संसद भवनाचे उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडलं. या कार्यक्रमास देशातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली. दुसरीकडे नवीन संसद भवनाच्या समोर आंदोलनासाठी निघालेल्या कुस्तीपटूंना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. यावेळी पोलीस- कुस्तीपटूंमध्ये राडा झाल्याचे देखील पाहायला मिळालं.

पोलिसांनी देशासाठी पदक जिंकणाऱ्या खेळाडूंची धरपकड केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. राहुल गांधी यांनी देखील हा व्हिडीओ ट्वीट केला आहे.  एकीकडे देशात नव्या संसद भवनाचे उद्घाटन होत आहे आणि दुसरीकडे खेळाडूंना मात्र वाईट वागणूक दिली जात असल्याबद्दल सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे.

कुस्तीपटू साक्षी मलिकने या घटनेचा व्हिडीओ शेअर केला आहे. साक्षीने या व्हिडीओ सोबत देशातील चॅम्पियन्सना अशीच वागणूक दिली जात आहे. अख्खं जग आपल्याला पाहत आहे! असं कॅप्शन दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सभ्य रहा, नीट कपडे परिधान करा! भाडेकरू मुलींना घरमालकाचा सल्ला, रूममध्ये लावला CCTV कॅमेरा

Duleep Trophy 2026: हा, मुलगा कमाल आहे! वैभव सूर्यवंशीच्या सांगण्यावरून DRS घेतला अन् सामन्यात ट्विस्ट आला Video Viral

मुलांना शाळेत जायला चीनने बांधली ९०० फूट उंच लिफ्ट, आता पर्यटकांची होते गर्दी; विद्यार्थ्यांचा ३ तासांचा प्रवास काही मिनिटात

Marathi News Live Updates : सरकारने आवश्यक ते निर्णय घेतलेत, शिष्टमंडळ जरांगेंकडे जाणार नाही : विखे-पाटील

Uttar Pradesh: अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात ५० टक्के वाढ! दीड लाखांहून अधिक महिलांना योगी सरकारचे गिफ्ट

SCROLL FOR NEXT