Rahul Gandhi  
देश

Rahul Gandhi : "मी काय खून केला का?" राहुल गांधी हायकोर्टात काय म्हणाले?

Sandip Kapde

Rahul Gandhi : सुरतच्या सत्र न्यायालयाकडून दिलासा न मिळाल्याने राहुल गांधी यांनी मोदी आडनाव प्रकरणी गुजरात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणाची तातडीने सुनावणी घेण्याची विनंती राहुल गांधी यांनी केली आहे. या याचिकेवर आज (शनिवारी) हायकोर्टात सुनावणी झाली. या प्रकरणी आजा २ मे रोजी सुनावणी होणार आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी हे जनतेने निवडून दिलेले प्रतिनिधी आहेत, त्यामुळे त्यांनी असे शब्द वापरू नयेत, असे गुजरात उच्च न्यायालयाने आज म्हटले आहे. गुजरात उच्च न्यायालयाचे न्यायाधीश हेमंत प्रच्छक म्हणाले, राहुल गांधी यांनी मर्यादेत राहून वक्तव्य करावे. ते मोठ्या प्रमाणात लोकांचे प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे त्यांचे कर्तव्य आहे.

यावेळी राहुल गांधी यांनी देखील युक्तिवादात आपली भूमिका मांडली. राहुल गांधी म्हणाले, मी कोणताही खून केला नाही. निवडणूक लढवण्यास ८ वर्षांची बंदी म्हणजे हा मोठा अतिरेक आहे.

शिक्षेला स्थगिती द्यायची की नाही, याचा निर्णय न्यायालय आणि आरोपी यांच्यात आहे. तक्रारदाराचा याच्याशी काहीही संबंध नाही, असे राहुल गांधी यांचे वकिल मनू सिंघवी यांनी स्पष्ट केले.

सत्र न्यायालयाकडून धक्का -

मोदी आडनावाबाबत मानहानीच्या प्रकरणात दोषी ठरलेले राहुल गांधी यांना संसदेतून निलंबित करण्यात आले आहे. मानहानीच्या खटल्यातील शिक्षेला स्थगिती मिळावी यासाठी राहुल गांधी यांनी सुरत येथील सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने २० एप्रिल रोजी गांधी यांची याचिका फेटाळली. सविस्तर आदेशात, सत्र न्यायालयाने गांधींच्या अपात्रतेवर अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला. यानंतर राहुल गांधी यांनी गुजरात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

Sachin Ahir: उपसभापतिपदाची प्रतिष्ठा वाढवेन: सचिन अहिर यांची ग्वाही; कष्टकरी, कामगार, महाराष्ट्राशी बांधिलकी सोडणार नाही!

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

सौरऊर्जा मीटर जोडणीच्या ऑर्डरसाठी घेतली ४ हजार रुपयांची लाच; सहायक अभियंत्याला रंगेहात पकडलं...

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

SCROLL FOR NEXT