Rahul Gandhi And Narendra Modi esakal
देश

कित्येकांचे हास्य मोदी सरकारने हिरावले - राहुल गांधी

'कित्येक कुटुंब वाळलेली भाकर खाण्यास मजबूर आहेत?'

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : निवडणुकीच्या रणधुमाळीत लोकांच्या मुलभूत मुद्द्यांचा विसर राजकारण्यांना पडला आहे. उठसूठ प्रत्येक जण एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करित आहेत. रोजगार, महागाई, पेट्रोल-डिझेलचे भाव यासह इतर मुद्दे राजकारणी विसरल्याचे दिसत आहे. आकड्यातून स्पष्ट दिसते, की महागाई वाढत चालली असून उत्पन्न घटत आहे, या शब्दात काँग्रेस (Congress Party) नेते राहुल गांधी यांनी सद्यःस्थितीचा उल्लेख केला आहे. आज केलेल्या ट्विटमध्ये पुढे ते म्हणतात, मात्र जनतेचे दुःख आणि वेदना कसे मोजावे? कित्येक कुटुंब वाळलेली भाकर खाण्यास मजबूर आहेत? किती मुलांना शाळांमधून काढण्यात आले? किती महिलांचे दागिने गाहाण ठेवले गेले? कित्येकांचे हास्य मोदी सरकारने हिरावले, अशी टीका राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी मोदी सरकारवर केली आहे. (Rahul Gandhi Attack Modi Government Over Inflation, Unemployment)

त्यांच्या ट्विटला प्राची शिरुर यांनी मोदींचा एक व्हिडिओसह प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणतात, जनता महागाईचा मार झेलत आहे आणि मोदीजी (Narendra Modi) फोटोशूटमध्ये मस्त आहेत. लिहिण्याचेही नाटक करित आहेत. साक्षर असते तर गरिबी आणि महागाईचे आकडे समजले असते. त्यांनी गरिबांना काही तरी दिलासा दिला असता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray Video: उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ व्हायरल; 'जय गुजरात'चा दिला होता नारा

Pune Kondhwa Rape Case : पुणे 'कुरियर बॉय' बलात्कार प्रकरण; आरोपीस अटक अन् धक्कादायक माहितीही उघड!

Sushil Kedia Tweet: देवेंद्रजी आणि अमितजी मला वाचवा! माझ्याविरोधात मोठी मोहीम...; सुशील केडियांची संरक्षणासाठी धाव

IND vs ENG 2nd Test: २४ वर्षांच्या पोराचे शतक! जेमी स्मिथ-हॅरी ब्रूक्सच्या खेळीने इंग्लंडचा पलटवार; गौतम गंभीरचा फसला प्लॅन

Ulhasnagar Crime : दारू पार्टीतील किरकोळ वादातून मित्राकडून मित्राचा खून; आरोपी शकील शेखला बेड्या

SCROLL FOR NEXT