देश

मृतांचे आकडे लपवून मोदींचा PR स्टंट; राहुल गांधींच्या टीकेवर भाजपही आक्रमक

विनायक होगाडे

नवी दिल्ली: देशात सध्या कोरोना संकटाने (Corona Crisis) मोठं थैमान माजवलं आहे. कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात मोदी सरकार अयशस्वी ठरलं असल्याची टीका विरोधकांकडून सातत्याने करण्यात येते. दुसरीकडे आता जागतिक माध्यमांमध्ये देखील मोदी सरकारच्या (Modi Government) कोरोना परिस्थिीती हाताळण्यावरुन टीकेचा भडीमार करण्यात येतो आहे. यासंदर्भात अलिकडेच 'न्यूयॉर्क टाईम्स'ने दिलेल्या बातमीनुसार भारतातील कोरोना मृतांची संख्या ही सरकारी आकडेवारीपेक्षा अधिक असण्याचा दावा केला गेला आहे. तर दुसरीकडे आता राहुल गांधी यांनी देखील कोरोना मृतांच्या संख्येवरुन आणि पंतप्रधान मोदींच्या (PM Modi) जाहिरातबाजीवरुन टीका केली आहे. (Rahul Gandhi Attack PM Modi saying Positivity is a PR stunt to hide the actual number of Corona deaths)

राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटरवर म्हटलंय की, 'पॉझिटीव्हीटी' हा पंतप्रधानांचा एक पीआर स्टंट आहे. त्यांच्या कृतीमुळे आणि निर्णयांमुळे झालेले कोरोनाचे मृत्यू झाकण्यासाठी हा पीआर स्टंट करण्यात आला आहे.

दुसरीकडे यांसदर्भात भाजपने काँग्रेसवरच पलटवार केला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशात मृत्युमुखी पडणाऱ्या लाखो दुर्दैवी लोकांची आकडेवारी आणि वास्तविक परिस्थिती यात फरक असेल तर महाराष्ट्र, राजस्थानसह काँग्रेसशासित राज्यांनी त्यांच्याकडील मृतांचे खरे आकडे लपविले हाच अर्थ होतो, असा गंभीर आरोप भाजपने केला आहे. कॉंग्रेस नेतृत्वाने याबद्दल काँग्रेस सत्तेत असलेल्या महाराष्ट्रासह इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना खडसावले पाहिजे, असाही सल्ला भाजपने दिला. दरम्यान, जी राज्ये पुरेशी लस मिळत नसल्याची ओरड करतात त्यांनी केंद्राकडून मोफत मिळालेल्या लसमात्रांचे व्यवस्थापन नीट होईल याची दक्षता घ्यावी, अशीही सूचना भाजपने दिल्लीसह अन्य राज्यांना केली.

केंद्राकडून मृत्युमुखी पडणारे आणि नवे रुग्ण यांची २४ तासातील जी आकडेवारी दिली जाते ती राज्यांकडून आलेल्या दैनंदिन माहितीवरच आधारित असते, असा दावा भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी केला. राहुल गांधी यांच्या रोजच्या ट्विटमुळे कोरोना जाणार नाही, असा टोला लगावून पात्रा म्हणाले, की त्यांना काहीही कळत नाही आणि साऱ्या विषयावर त्यांना बोलायचे असते. शतकातून एकदाच येणारे संकट घालवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याप्रमाणे प्रत्यक्ष जमिनीवर उतरून काम करायचे असते, जे राहुल गांधी यांनी कधीही केलेले नाही. रोज सकाळी ट्विट करणे आणि पंतप्रधानांवर टीका करणे यापेक्षा त्यांनी महाराष्ट्रासह इतर काँग्रेसशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना दडपेगिरीबद्दलची विचारणा करावी. याचे खरे उत्तर कदाचित कोणी दिलेच तर राहुल गांधी यांना पुढचे ट्विट लसीकरण या विषयावर करण्याची वेळच येणार नाही, असाही टोला पात्रा यांनी लगावला.

दिल्ली सरकारकडून १३ टक्के लसीकरण

केंद्राकडून लसी मिळत नसल्याची तक्रार करणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे कायम धादांत खोटेच बोलतात, असा आरोप करून पात्रा म्हणाले, की दिल्लीला आतापावेतो ५२ लाख २५ हजार २४० लस मात्र मिळाल्या. यात ४५ लाख ४६ हजाराहून जास्त लस तर केंद्र सरकारनेच मोफत दिल्या. दिल्लीतील खासगी रुग्णालयांनी ९ लाख ४ हजार लसी खरेदी केल्या. केजरीवाल सरकारने केवळ ८ लाख १७ हजार ६९० लसी खरेदी केल्या. म्हणजेच दिल्ली सरकारने केवळ यात १३ टक्के लोकांचे लसीकरण केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

One Chip Challenge: अति मसालेदार चिप्स खाल्ल्याने हृदयविकाराचा झटका; तरुणाने गमावला जीव

Hardik Pandya Banned : T20 वर्ल्ड कपपूर्वी BCCIने हार्दिक पांड्यावर घातली बंदी! 'या' चुकीची मोजावी लागली किंमत

Loksabha News: मोदींनी घेतली नाही ठाकरेंच्या मागण्यांची दखल, नागरिकांमध्ये रंगल्या चर्चा

IPL 2024 : लाजिरवाण्या पराभवासह मुंबई इंडियन्सचा प्रवास थांबला; पांड्या म्हणाला, फक्त हा सामनाच नव्हे तर...

Share Market Today: शेअर बाजाराच्या विशेष सत्रात आज कोणते शेअर्स असतील तेजीत? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

SCROLL FOR NEXT