Bharat Jodo Yatra  esakal
देश

Rahul Gandhi : भारत जोडो यात्रा थांबणार? लोकांकडून यात्रेला का होतोय विरोध

दत्ता लवांडे

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात येऊन दहा दिवस झालेत. तर अनेकांकडून आता गांधी यांची ही यात्रा रोखण्याची मागणी लोकांकडून करण्यात येतेय. राहुल गांधी यांनी काल एका सभेत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात येत आहे. तर आता या प्रकरणाला काय वळण मिळणार याकडे लक्ष लागलेले आहे.

(Rahul Gandhi Bharat Jodo Yatra Latest Updates)

हेही वाचा - Gautami Patil- लावणीचा बाजच अश्लीलतेचा?

दरम्यान, सभेदरम्यान राहुल गांधी यांनी "सावरकरांना इंग्रजांकडून पेन्शन मिळायची, ते इंग्रजांसाठी काँग्रेस पक्षाविरोधात काम करायचे" असं सांगितलं होतं. त्यांनी इंग्रजांना "मी तुमचा नोकर बनू इच्छितो अशा आशयाचं पत्र लिहिलं होतं" असंही गांधी म्हणाले. त्याचबरोबर यावेळी त्यांनी माध्यमांना सावरकरांनी लिहिलेलं पत्र दाखवलं. तर त्यांच्या या विधानावर हिंदुत्ववादी संघटनांनी त्यांचा निषेध केला.

राहुल गांधींच्या वक्तव्याचे पडसाद पुणे, नागपूरसहित अनेक ठिकाणी उमटले. हिंदुत्ववादी संघटनांनी त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला. तर पुण्यात राहुल गांधींच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करण्यात आलं. राहुल गांधी यांची यात्रा आता रोखण्यात यावी अशी मागणीही अनेकांकडून करण्यात येत आहे. पण "हा लोकांचा विचार आहे, त्यामुळे त्यांना ही यात्रा थांबावी असं वाटतंय तर तो त्यांचा विचार आहे आणि बरोबर आहे" असं प्रत्युत्तर राहुल गांधींनी दिलंय.

राहुल गांधी काय म्हणाले होते?

सावरकर दोन-तीन वर्षे अंदमानच्या तुरुंगात राहिले. त्यानंतर त्यांनी इंग्रजांना माफीनामे पाठवायला सुरुवात केली. नंतरच्या काळात सावरकरांनी वेगळ्या नावाने स्वत:वर पुस्तक लिहलं आणि आपण किती शूरवीर होतो हे सांगितलं. सावरकरांना इंग्रजांकडून पेन्शन मिळायची, ते इंग्रजांसाठी काँग्रेस पक्षाविरोधात काम करायचे, असं राहुल गांधी यांनी म्हटलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

King Cobra in Sindhudurg : कोकणात 'शक्तिपीठ'च्या प्रस्तावित मार्गावर आढळला 7 फुटी 'किंग कोब्रा'; तळकटच्या जंगलात पिलांचाही वावर असण्याची शक्यता

Mumbai : ४८ वर्षांपूर्वी ५० हजारात ठरलेला व्यवहार, वाद कोर्टात पोहोचला; महिलेला मिळाला घराचा ताबा, २५ लाख रुपये द्यावे लागणार

Pune Sex Racket Bust : पुण्यात चाललंय काय? नामांकित कॉलेजवळच सुरू होते सेक्स रॅकेट, ४ तरुणींची सुटका, ३ जणांना अटक

Latest Marathi News Live Update : बुलढाण्यात फास्टॅग बिघाड; टोल नाक्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा

29 वर्षाचे रजनीकांत 16 वर्षांच्या अभिनेत्रीशी करणार होते लग्न; ‘त्या’ एका अपशकुनामुळे तुटली स्वप्नांची दोरी!

SCROLL FOR NEXT