rahul gandhi  sakal
देश

Rahul Gandhi : कॉलेजनंतर तरुणांना मिळणार एक लाख रुपये; राहुल गांधींच्या 5 मोठ्या घोषणा

Loksabha Election 2024 : देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोठं आश्वासन देऊन मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. जर देशामध्ये काँग्रेसचं सरकार आलं तर ३० लाख जागांसाठी पदभरती केली जाईल, असं राहुल म्हणाले.

संतोष कानडे

Loksabha Election 2024 : देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोठं आश्वासन देऊन मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. जर देशामध्ये काँग्रेसचं सरकार आलं तर ३० लाख जागांसाठी पदभरती केली जाईल, असं राहुल म्हणाले.

याबरोबरच राहुल गांधी यांनी महाविद्यालयीन तरुणांना आकर्षित करण्यासाठी एक नवीन घोषणा केली आहे. कॉलेज पूर्ण झाल्यानंतर एक लाख रुपये अप्रेंटिसशिप देण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. यासह 'युवा न्याय'अंतर्गत पाच मोठ्या घोषणा राहुल यांनी केल्या आहेत.

मणिपूर ते मुंबई अशी भारत जोडो न्याय यात्रा सुरु आहे. गुरुवारी राजस्थानच्या बांसवाडा येथे एका जाहीर सभेला राहुल गांधींनी संबोधित केलं. ते म्हणाले की, देशभरात ३० लाख सरकारी जागा रिकाम्या झालेल्या आहेत. मोदी या जागा भरत नाहीत. परंतु काँग्रेस सरकार आल्यानंतर आमचं पहिलं काम असेल की ३० लाख नोकऱ्या आम्ही देणार आहोत.

दुसरीकडे गुरुवारी काँग्रेसने जागावाटपासंदर्भात एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीमध्ये राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि अन्य वरिष्ठ काँग्रेस नेत्यांचे मतदारसंघ निश्चित होणार असल्याची माहित आहे.

भाजपने आपली १६ जिल्ह्यातील १९५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. इंडिया आघाडीमध्ये झालेल्या पडझडीनंतर आता पुढे काय होणार? असा प्रश्न निर्माण होतोय. त्यातच राहुल गांधींनी तरुणांना आणि नवमतदारांना आकर्षित करण्यासाठी कॉलेजनंतर एक लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : राज्यात परतीच्या पावसाचा जोर वाढणार; विदर्भ-मराठवाड्यासह २९ जिल्ह्यांना येलो अलर्ट

Chana Moong Dal Chilla: हेल्दी नाश्ता म्हणजे बेचव नाही! असा बनवा चणे-मूग चिला! खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल

आजचे राशिभविष्य - 23 सप्टेंबर 2026

Azamgarh Hostage Crisis : आझमगढ हादरलं! आधी पत्नी अन् दोन पुजाऱ्यांची हत्या, मग मुलावर झाडली गोळी; ८ तासांच्या ऑपरेशननंतर आरोपीचा एन्काउंटर

Sangli ACB Trap : भूमी अभिलेखमधील दोघे लाच घेताना जाळ्यात; ईश्‍वरपुरात रचला सापळा, प्रॉपर्टी कार्डावर क्षेत्र दुरुस्तीसाठी घेतले 50 हजार

SCROLL FOR NEXT