Manipur Violence 
देश

Manipur Violence: मणिपूर दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधींचा ताफा पोलिसांनी अडवला, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक! अखेर...

Sandip Kapde

Manipur Violence:   काँग्रेस नेते राहुल गांधी दोन दिवसांच्या मणिपूर दौऱ्यावर आहेत. काही वेळापूर्वी ते मणिपूरमध्ये पोहोचले आहेत. ते इम्फाल एअरपोर्टवरुन बाय रोड चुराचांदपूर जाण्यासाठी निघाले होते. परंतु विष्णूपूरमध्ये पोलिसांनी राहुल गांधी यांचा ताफा अडवला.

पोलिसांच्या या भूमिकेविरोधात काँग्रेसचे स्थानिक कार्यकर्ते आणि स्थानिकांनी आंदोलनाचे हत्यार उपसले. पोलिसांच्या आग्रहामुळे राहुल गांधी पुन्हा इम्फालकडे परतले आहेत. आता ते इम्फाल एअरपोर्टवरून हेलिकॉप्टरने पूर्वनियोजित कार्यक्रमासाठी रवाना झाले.

मणिपूर पोलिसांनी राहुल गांधी यांच्या ताफ्याला विष्णूपूर येथे रोखलं होतं. पोलिसांनी त्यांना पुढे जाण्यासाठी परवानगी दिली नाही.

विष्णूपूरमध्ये तासनतास अडकल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी गुरुवारी चुरचंदपूरला जाण्यासाठी हेलिकॉप्टरमध्ये बसले. त्यांच्या ताफ्याला पोलिसांनी अडवले. इम्फाळपासून सुमारे 20 किमी अंतरावर असलेल्या बिष्णुपूर येथे त्यांना थांबावे लागले.

पोलिसांनी हल्ल्याच्या भीतीने त्यांचा ताफा थांबवल्याचे सांगितले. विमानतळावरील एका सूत्राने सांगितले की, “राहुल गांधी यांनी चुरचंदपूरला जाण्यासाठी राज्य सरकारने दिलेल्या हेलिकॉप्टरचा वापर केला. हेलिकॉप्टरमध्ये त्यांच्यासोबत उच्च पोलीस आणि प्रशासन अधिकारी होते."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT