rahul gandhi criticize modi govt says stop fooling citizens on petrol central excise
rahul gandhi criticize modi govt says stop fooling citizens on petrol central excise  
देश

नागरिकांना मूर्ख बनवणं थांबवा, राहुल गांधींचा केंद्र सरकारवर निशाणा

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : काल केंद्र सरकारने उत्पादन शुल्कात कपात करण्याची घोषणा केली आहे, पेट्रोलवरील केंद्रीय शुल्क प्रतिलिटर 8 रुपये आणि डिझेलवर 6 रुपयांनी कपात करण्याची सरकारची घोषणा म्हणजे जनतेला मूर्ख बनवण्याचा निर्णय असल्याचे राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी म्हटले आहे. त्यांनी आपल्या मुद्द्याच्या समर्थनार्थ काही मागील आकडेवारी मांडली आहे. (Petrol-Diesel Prices)

राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, 1 मे 2020 रोजी 69.5 रुपये प्रति लिटर असलेले पेट्रोल 1 मार्च 2022 ला 95.4 रुपये प्रति लिटर झाले आहे. ते पुढे म्हणाले की, तेच पेट्रोल 1 मे 2022 रोजी 105.4 रुपये प्रति लिटर आणि 22 मे रोजी 96.7 रुपये प्रति लिटर होते. म्हणजेच काही दिवसांत टॅक्सचे पैसे हळूहळू वाढतात आणि नंतर काही रुपये कमी होतात, याकडे राहुल गांधी याकडे लक्ष वेधले आहे.

राहुल यांनी ट्विट केले आहे की, आता, पेट्रोलमध्ये पुन्हा 0.8 रुपये आणि 0.3 रूपयांच्या दैनिक डोसमध्ये 'विकास' दिसेल अशी अपेक्षा आहे. सरकारने नागरिकांना मूर्ख बनवणे थांबवावे. विक्रमी महागाईपासून लोकांना दिलासा मिळायला हवा, असे ट्वीट त्यांनी केले आहे.

राहुल गांधी यांच्या ट्विटचा अर्थ असा आहे की, मार्च ते मे दरम्यान पेट्रोल आणि डिझेलच्या दरात झालेली वाढ ही केंद्र सरकारने केंद्रीय शुल्क कपात करण्याच्या घोषणा केलेल्या कपातीपेक्षा जास्त होती.

युक्रेन युद्धादरम्यान भारतातील जीवनावश्यक वस्तूंच्या किमती विक्रमी उंचीवर पोहोचल्याने अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी उत्पादन शुल्कात कपातीसह अनेक महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. केंद्रीय उत्पादन शुल्कात या कपातीमुळे पेट्रोलचे दर 9.5 रुपयांनी, तर डिझेल 7 रुपयांनी स्वस्त झाले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT