Rahul Gandhi  Team eSakal
देश

नोटाबंदी, कलम ३७० रद्द करुनही दहशतवाद थांबलेला नाही - राहुल गांधी

श्रीनगरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्यावरुन त्यांनी केंद्राला धारेवर धरले.

सुधीर काकडे

जम्मू काश्मीरमध्ये आज पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी हल्ला केला असून, यावेळी दहशतवाद्यांनी शाळेतील शिक्षकांवर निशाणा साधल्याचं दिसून आलं. श्रीनगरच्या सफाकदल भागातील मुलांच्या शासकीय उच्च माध्यमिक शाळेत घुसून दहशतवाद्यांनी दोन शिक्षकांची आज गोळ्या झाडून हत्या केली. या हल्ल्यानंतर परिसरात दहशत निर्माण झाली असून, या घटनेबद्दल हळहळ व्यक्त केली जातेय. यानंतर आता राहुल गांधी यांनी काश्मीरच्या सुरक्षेच्या मुद्दयावरून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

कलम ३७० नंतर जम्मू काश्मीरमध्ये मोठे बदल झाल्याचे केंद्र सरकारकडून सांगण्यात येतंय. राहुल गांधींनी आता या मुद्दयावरून केंद्र सरकारवर निशाणा साधला. 'काश्मीरमध्ये हिंसेच्या घटना वाढतच जातायेत. दहशतवाद ना कलम ३७० रद्द केल्याने कमी झाला ना नोटबंदीने कमी झाला. केंद्र सरकार सुरक्षा देण्यास पूर्णपणे अपयशी ठरले आहे. काश्मीरमधील आमच्या बंधू भगीनींवर होणारे हल्ल्यांचा आम्ही निशेध करतो आणि या घटनेत मृत्यू झालेल्या लोकांच्या कुटुंबीयांबद्दल संवेदना व्यक्त करतो असे ट्विट करत राहुल गांधीं यांनी केले आहे.

जम्मू काश्मीरमध्ये कलम ३७० रद्द केल्यानंतर मोठ्या प्रमाणावर बदल झाले असून, काश्मीरी पंडीत आणि बिगर मुस्लीम समुदाय काश्मीरमध्ये परत येताना दिसत आहे. याच गोष्टीमुळे पाकिस्तानमधून अतिरेकी हिंदू आणि शीखांविरोधात घातपाताचे कट रचत असल्याची माहिती जम्मू काश्मीर पोलिस महासंचालक दिलबाग सिंग यांनी दिली आहे.

दिलबाग सिंग म्हणाले की, मानवता, बंधुता, स्थानिक संस्कृती आणि मूल्यांवर हल्ला करणाऱ्यांचे चेहरे लवकरच समोर येतील. "एकापाठोपाठ झालेल्या हल्ल्यांमध्ये अनेक नागरिकांचा बळी गेला आहे, त्याबद्दल आम्ही खेद व्यक्त करतो. आम्ही मागील घटनांचा तपास करत आहोत आणि श्रीनगर पोलिसांना अनेक लीड्स मिळाल्या आहेत. आम्ही या भ्याड हल्ल्यांमागील लोकांपर्यंत पोहोचू. मला खात्री आहे की पोलीस त्यांना लवकरच शोधून काढतील."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: ''मी 'आरएसएस'चेही रक्षण करणार'', राहुल गांधींचं मोठं विधान, संघाबद्दल नेमकं काय म्हणाले?

WTC Final Qualification Scenario: भारताला फायनलमध्ये पोहोचायचं असेल तर उरलेले सामने महत्त्वाचे; जाणून घ्या टीम इंडियाचं गणित

मला तिचे बॉयफ्रेंड आवडत नाहीत... लेकीच्या रिलेशनशिपवर संजय जाधव यांचं स्पष्ट मत; म्हणाले, 'तुम्ही घरी या, बोला, पण...'

NHAI New Rules: रुग्णवाहिका उशिरा आली तर दंड होणार! NHAI चा मोठा निर्णय; सर्व प्रकल्पांत ‘केअर सिस्टम’ बंधनकारक, नवे नियम काय?

BMC Recruitment: मुंबई महापालिकेत ६१२ जागांवर भरती; ITI पास तरुणांना मोठी संधी! पाहा कोणती पदे आणि अर्ज प्रक्रिया काय?

SCROLL FOR NEXT