Rahul Gandhi on PM Modi sakal
देश

'मोदींचा संघवाद सहकारी नसून...', इंधन दरवाढीवरून राहुल गांधींची टीका

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : पंतप्रधान मोदींनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत कोरोना आढावा बैठक घेतली. पण, या बैठकीत पेट्रोल-डिझेल दरवाढीचा (Petrol Diesel Rate Hike) मुद्दा उपस्थित केला. बिगरभाजपशासित राज्यांवर टीका केली. त्यावरून आता राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पंतप्रधान मोदींवर (PM Modi) टीका केली आहे. मोदींचा संघवाद हा सहकारी नसून जबरदस्तीचा आहे, असं राहुल गांधी म्हणाले.

इंधन दरवाढ, कोळशाची टंचाई, ऑक्सिजनची टंचाई या सर्व गोष्टींसाठी राज्यांना दोष द्यायचा. केंद्र सरकार इंधनावरील ६८ टक्के कर घेतेय. तरीही पंतप्रधान मोदी जबाबदारी झटकतात. मोदींचा संघवाद हा सहकारी नसून जबरदस्तीचा आहे, असं राहुल गांधी म्हणाले.

नेमकं काय घडलं? -

देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदींनी कोरोनाचा आढावा घेण्यासाठी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली. पण, मध्येच इंधनदरवाढीचा मुद्दा उपस्थित केला. केंद्राने पेट्रोल-डिझेलवरील कर कमी करून जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न केला. तसेच भाजपचं सरकार असलेल्या राज्यांनी देखील कर कमी करून जनतेला दिलासा दिला. पण, महाराष्ट्र, केरळ, पश्चिम बंगाल यांसारख्या राज्यांनी इंधनावरील कर कमी केला नाही. त्यामुळे पेट्रोल-डिझेल इतकं महाग आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

दरम्यान, मोदींनी इंधनदरवाढीची जबाबदारी राज्यावर ढकलल्याची टीका झाली. तसेच मोदी इंधनदरवाढ कमी करण्यात अपयशी ठरले त्यामुळे राज्यांना दोष दिला जात आहे, असा आरोपही विरोधकांनी त्यांच्यावर केला. पंतप्रधान मोदींचं भाषण एकतर्फी होतं, असं पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या. तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील जोरदार निशाणा साधला. केंद्राकडे आमचे पैसे थकले असून वारंवार मागणी करूनही पैसे मिळत नसल्याचं ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI Tax: यूपीआय टॅक्स मागे घेण्याचं राहुल गांधींचं आवाहन; इंदिरा गांधींचा दाखला देत पंतप्रधान मोदींवर घणाघात

HOROSCOPE: वयाची 50 ओलांडली तरी दिसतात तरुण! ‘या’ 6 राशींच्या लोकांचं व्यक्तिमत्त्व आणि आत्मविश्वास असतो जबरदस्त; तुमची रास कोणती?

ICC Rankings : अभिषेक शर्माने पाकिस्तानी फलंदाजाला लोळवले! Ishan Kishan ने त्याचे अव्वल स्थान कायम राखले

Hingoli News : दुष्काळाच्या झळांनी खरीप करपला; शेतकऱ्यांना मदतीची आस! मानसपिंप्रीत पालकमंत्री नरहरी झिरवाळांकडून नुकसानीची पाहणी, एकरी ५० हजारांची मदतीची मागणी

Marathi News Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन दगडूशेठच्या दर्शनाला

SCROLL FOR NEXT