Congress leader Rahul Gandhi criticizes Prime Minister Narendra Modi over the Parth Pawar land deal controversy during a press briefing.
esakal
Rahul Gandhi targets PM Modi over Parth Pawar land deal case : सध्या राज्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचे पुण्यातील जमीन व्यवहाराचे प्रकरण चांगलेच गाजत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांनी पार्थ पवारांवर आरोप केले आहेत.
तब्बल १८०० कोटींची जमीन केवळ ३०० कोटींना खरेदी करण्यात आली आणि अवघी ५०० रुपये स्टॅम्पड्यूटी भरल्याचा दावा दानवेंनी केला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान लोकसभा विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या प्रकरणावरून पंतप्रधान मोदींवर मोठा आरोप केला आहे.
राहुल गांधी म्हणाले, ‘’महाराष्ट्रात १८०० कोटींची शासकीय जमीन, जी दलितांसाठी आरक्षित होती, केवळ ३०० कोटीत मंत्र्याच्या मुलाच्या कंपनीला विगली गेली. एवढच नाहीतर वरून स्टॅम्प ड्यूटीही हटवली गेली. म्हणजेच एक तर लूट आणि त्यावर कायदेशीर मंजुरीतही सूट’’
तसेच ‘’मतांच्या चोरीतून स्थापन झालेल्या सरकारची ही 'जमीन चोरी' आहे. त्यांना माहीत आहे की त्यांनी कितीही लुटले तरी ते मतं चोरी करून पुन्हा सत्तेत येतील. त्यांना लोकशाहीची, जनतेची किंवा दलितांच्या हक्कांची पर्वा नाही.’’असा आरोप राहुल गांधींनी केला आहे.
याशिवाय, ‘’मोदीजी, तुमचे मौन बरेच काही सांगते. तुम्ही यासाठी गप्प आहात, कारण तुमचे सरकार त्याच लुटारूंवर टिकलेले आहे जे दलित आणि वंचितांचे हक्क हिसकावून घेतात?’’ अशा शब्दांत राहुल गांधी यांनी या प्रकरणावरून जोरदार टीकास्त्र सोडले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.