Rahul Gandhi 
देश

Defamation Case: मोदी आडनाव प्रकरणी राहुल गांधींनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केले उत्तर! म्हणाले...

Sandip Kapde

Defamation Case: मोदी आडनाव प्रकरणी राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात उत्तर दाखल केले आहे. राहुल गांधी यांच्या याचिकेवर ४ ऑगस्टला सुनावणी आहे. यापूर्वी राहुल गांधींनी त्यांचे उत्तर दाखल केले.

गुजरात सत्र न्यायालयाने राहुल गांधी यांना शिक्षा सुनावली आहे. यामुळे त्यांची खासदारकी देखील रद्द झाली. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने शिक्षेला स्थगिती द्यावी, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली.

माझी केस अपवाद म्हणून बघून दिलासा द्यावा. मानहानीच्या खटल्यात शिक्षा झाल्यामुळे माझी खासदारकी रद्द झाली आहे. पूर्णेश मोदी हे मुळात मोदी समाजातील नाहीत. माफी न मागितल्याने मला अहंकारी म्हणणे चुकीचे आहे, असे राहुल गांधी म्हणाले.

मोदी आडनाव बदनामी प्रकरणी पूर्णेश मोदी यांनी 31 जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात उत्तर दाखल केले होते. यामध्ये त्यांनी राहुल गांधी यांची याचिका फेटाळण्याची मागणी केली आहे. तर राहुल गांधींनी त्यांच्या शिक्षेला स्थगिती देण्याची मागणी केली आहे आणि त्यावर 4 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे.

राहुल गांधी यांना या वर्षी मार्चमध्ये सुरत न्यायालयाने दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती आणि गुजरात उच्च न्यायालयाने 7 जुलै रोजी त्यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यास नकार दिला होता. यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने  21 जुलै रोजी गुजरात सरकारसह संबंधित पक्षांना नोटीस बजावून उत्तर दाखल करण्यास सांगितले होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood Indian Missing : नेपाळमध्ये शेकडो भारतीय पर्यटक बेपत्ता, महाराष्ट्र सरकारकडून हेल्पलाइन सुरू, असा करा संपर्क

Gokul Election 2026 : 'गोकुळ'च्या सत्ताकारणाचा काउंटडाऊन सुरू! अंतिम मतदार यादीची तारीख ठरली; उमेदवारी अर्जाचा मुहूर्तही निश्चित, 410 संस्थांच्या हरकतीवर सुनावणी

Pune News: आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची झिरवळांकडून थट्टा? ‘खाऊन-पिऊन आंदोलन करा’ म्हणताच विद्यार्थ्यांनी सुनावलं

Hydrogen Train: जगातील सर्वांत शक्तिशाली हायड्रोजन रेल्वेचा नवा विक्रम; भारताच्या पहिल्या ट्रेनने ६ हजार किमी प्रवास पूर्ण

Marathi News Live Updates : कात्रज घाटात भाजपशी संबंधित निवडणूक साहित्याचा खच; स्वच्छता ग्रुपकडून कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT