rahul gandhi in ladakh big claim after meeting people chinese army entered in indian land  
देश

Rahul Gandhi News : लडाखमध्ये चीनच्या सैन्याने घुसखोरी केलीय; राहुल गांधीचा मोठा दावा

रोहित कणसे

काँग्रेस खासदार राहुल गांधी हे सध्या लेह-लडाख दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी वडील राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी बोलताना राहुल गांधी यांनी चीनच्या घुसखोरीबद्दल मोठे विधान केले.

राहुल गांधी म्हणाले की, येथे चिंतेची बाब म्हणजे चीनने आपली जमीन हिसकावून घेतली आहे. चिनी सैन्य या भागात घुसल्याचं लोकांचं म्हणणं आहे. त्यांची चराईची जमीन हिसकावून घेण्यात आली आहे, पण पंतप्रधान म्हणाले की, एक इंचही जमीन हिरावून घेतली गेली नाही, पण हे खरे नाही. तुम्ही इथे कोणालाही विचारू शकता.

यानंतर पुढे बोलताना राहुल गांधी म्हणाले की, लडाखच्या लोकांच्या खूप तक्रारी होत्या, त्यांना जो दर्जा देण्यात आला आहे, त्यावर ते खूश नाहीत. त्यांना प्रतिनिधित्व हवे आहे. येथे बेरोजगारीची समस्या आहे. नोकरशाहीने राज्य चालवू नये, जनतेच्या माध्यमातून राज्य चालवावे, असे लोक म्हणत आहेत.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी वडील राजीव गांधी यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला शनिवारी लेह ते केंद्रशासित प्रदेश लडाखमधील पँगॉन्ग सरोवरापर्यंत मोटारसायकलवरून प्रवास केला. ते लडाखच्या दौऱ्यावर आहेत. ऑगस्ट २०१९ मध्ये जम्मू-काश्मीरचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन आणि जम्मू-काश्मीर आणि लडाखचे विभाजन झाल्यानंतर त्यांचा हा पहिलाच दौरा आहे. राहुल गांधी पुढील आठवड्यात कारगिलला भेट देण्याची शक्यता आहे.

राहुल गांधी रविवारी मोटारसायकलवरून नुब्रा व्हॅलीतकडे निघणार आहेत. वाटेत राहुल गांधी दुकानदार आणि शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांच्या भेटी घेऊ शकतात. राहुल गांधी हे सोमवारी लेहला परतणार आहेत.

लेहमधील काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी हा दौरा अराजकीय असल्याचे म्हटले असले तरी गुरुवारी राहुल गांधी यांचे आगमन होताच कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. राहुल गांधी यांनी दोन स्थानिक क्लबमधील फुटबॉल सामना पाहण्याबरोबरच पक्षातील सहकाऱ्यांसोबत बैठका घेतल्या आणि तरुणांशी संवाद साधला. काँग्रेस प्रवक्त्याने सांगितले की, राहुल गांधी सोमवारी किंवा मंगळवारी कारगिल जिल्ह्याचा दौरा करतील आणि तेथे पक्षाचे कार्यकर्ते आणि लोकांशी, विशेषत: तरुणांशी संवाद साधण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : पुण्यात महात्मा गांधीजींच्या पुतळ्याचे शिर उडवण्याचा प्रयत्न; एकाला पोलिसांनी घेतले ताब्यात

Lottery Scam : लॉटरीच्या नावाखाली दाम्पत्याने 600 लोकांना 40 कोटींचा घातला गंडा; लोकांनी 5 ते 10 लाखांपर्यंत केली होती गुंतवणूक

Maharashtra Rain Update News : राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस, पुढील पाच दिवस महत्वाचे; ११ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी

IT Park:'जमीन पसंत पडेना, आयटी पार्क होईना'; प्रशासनाचा कागदी खेळ, कृषि महाविद्यालयला पर्यायी प्रस्ताव मान्य नाही

Indian Railways: मिनिटाला निघणार दीड लाख तिकिटे; रेल्वे प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय,आरक्षण केंद्रातील यंत्रणेत बदल

SCROLL FOR NEXT