Rahul Gandhi meets Sharad Pawar 
देश

Rahul Gandhi meets Sharad Pawar: राष्ट्रवादी 'काँग्रेस'मध्ये विलीन होणार? शरद पवार राहुल गांधींच्या बैठकीत काय ठरलं?

Sandip Kapde

Rahul Gandhi meets Sharad Pawar: काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिल्लीत शरद पवार यांची भेट घेतली. राष्ट्रवादीतील बंडखोरीनंतर दोन्ही नेत्यांची ही पहिलीच भेट होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे आता काय होणार? पक्ष कुणाचा, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होणार का?, अशा अनेक चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.

राहुल गांधी आणि शरद पवार यांच्या बैठकीत काय चर्चा झाली हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या नेत्या सोनिया दुहान म्हणाल्या की, राहुल गांधी पवार साहेबांना भेटायला आले होते आणि त्यांचा पूर्ण पाठिंबा शरद पवारांना असल्याचे त्यांनी सांगितले आहे. काँग्रेस 100 टक्के आमच्या पाठीशी आहे आणि विरोधी पक्षही राष्ट्रवादीच्या पाठीशी उभे आहेत. आमच्या कार्यकारिणीच्या बैठकीत बहिष्कृत आमदार वगळता सर्वजण उपस्थित होते. (Rahul Gandhi meets Sharad Pawar)

आमच्याकडे सर्व काही आहे. काही लोक सोडले तरी हरकत नाही. शिवसेना प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय आमच्या बाजूने आहे. विधिमंडळ पक्ष फुटला म्हणजे पक्षात फूट पडली असे नाही. राहुल गांधी आले आणि आम्ही सगळे एकत्र आहोत, अशी ग्वाही त्यांनी दिली. शरद पवार आता मुंबईला रवाना झाले आहेत.

राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीमध्ये राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यानुसार, शरद पवारांची लोकशाही पद्धतीनं निवड करण्यात आली आहे. तसेच सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल तसेच कोहली या तीन खासदारांसह ९ आमदारांना निलंबित करण्यात आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil BJP Entry : जयंत पाटील भाजपात जाणार?, ४५ वर्षे खांद्याला खांदा देणाऱ्या दिलीप तात्यांच्या वाढदिवस कार्यक्रमात केला खुलासा

Pune University: पेपरफुटी, भ्रष्ट व्यवस्थेविरोधात मोठा लढा; ‘आयसा’चा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

“ही फियाट गाडी माझी म्हणू का” ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांचा धमाकेदार डान्स, सोशल मीडियावर Viral Video

Marathi News Live Updates : अंबाबाई मंदिर परिसरातील रस्त्यांची चाळण, खड्ड्यांत शिवसैनिक लावणार झाडे

ANAYA BANGAR: "माझं क्रिकेट संपलं वाटलेलं, पण अनाया बांगर हिचं मैदानात दमदार पुनरागमन! 'या' देशाने दिला ग्रीन सिग्नल, महिला लीग गाजवणार?

SCROLL FOR NEXT