Rahul Gandhi Net Worth esakal
देश

Rahul Gandhi Net Worth : राहुल गांधींकडे आहे कोट्यावधींची संपत्ती, लाइफस्टाईल अन्...

राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Rahul Gandhi Disqualified : काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष आणि आता माजी खासदार राहुल गांधी सध्या त्यांची खासदारकी रद्द झाल्याने चर्चेत आहे. २०१९ च्या निवडणुक प्रचारा दरम्यान त्यांनी मोदी समजाविरोधात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे त्यांच्यावर खटला दाखल झाला होतो. त्यात आज २४ मार्च २०२३ रोजी त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे.

राहुल गांधी राजकारणापेक्षा कायमच इतर कारणांनी जास्त चर्चेत राहीले आहेत. कधी त्यांच्या राहणीमान, कपडे यामुळे तर कधी भारत जोडो यात्रेमुळे आणि आता खासदारकी रद्द झाल्यामुळे चर्चेत असतात.

मागे त्यांच्या ४१ हजार रुपयांपेक्षाही महाग असलेल्या टी शर्टमुळे चर्चेत आले होते. त्यांच्याकडच्या टी शर्टचं कलेक्शन फार महागडं असतं असं सांगितलं जातं. एवढे महागडे कपडे वापरणाऱ्या राहुल गांधींच उत्पन्न किती असा प्रश्न सहाजिकच पडतो.

राहुल गांधी राजकीय क्षेत्रतलं प्रसिद्ध नाव आहे. देशातला सर्वात जूना पक्ष भारतीय राष्ट्रिय काँग्रेसचे माजी अध्यक्ष होते. त्यांनी स्वतः या पदाचा राजीनामा दिला. ते राष्ट्रिय काँग्रेसचा चेहरा म्हणून समोर आहेत.

राहुल गांधी यांचे शिक्षण आणि बालपण

  • त्यांचा जन्म १९ जून १९७० मध्ये नवी दिल्लीत झाला. ते सोनिया आणि राजीव गांधी यांचा मुलगा तर इंदिरा आणि फीरोज गांधी यांचे नातू आहेत.

  • त्यांनी सुरुवातीचं शिक्षण दिल्लीत घेतलं तर पुढील शिक्षण हावर्ड विश्वविद्यालयातून म्हणजे विदेशात घेतलं.

  • वडिलांच्या निधनानंतर सुरक्षात्मक कारणांनी त्यांनी फ्लोरिडाच्या रॉलिंस कॉलेजमध्ये नाव आणि ओळख लपवून शिक्षण घेतलं.

  • याविषयी फक्त कॉलेज प्रशासन आणि सुरक्षा एजंसीला माहिती होती.

  • त्यावेळी त्यांनी रॉल विंसी नावाने शिक्षण घेतलं.

  • त्यानंतर राहुल गांधींनी १९९५ मध्ये केंब्रिज विद्यापीठातून एम फीलची डिग्री घेतली.

राहुल गांधी यांचा फिटनेस

  • फार कमी लोकांना माहित असेल की राहुल गांधी यांनी जपानी मार्शल आर्ट ऐकिडोचं ट्रेनिंग घेतलं आहे.

  • या मार्शल आर्टमध्ये शास्त्राशिवाय शत्रुला हरवलं जातं.

  • वयाची ५० शी ओलांडल्यावरही राहुल गांधी एकदम फीट दिसतात.

  • ते रोज सकाळी सायकलिंग करतात. त्यांना स्विमिंग आणि स्कूबा डायव्हिंगपण आवडतं.

  • राहुल रोज सकाळी काही वेळ जीममध्ये वर्क आउट करतात.

राहुल गांधी यांची रुटीन लाइफ

  • राहुल गांधी यांच रुटीन लाइफ फार साधं आहे.

  • ते हेल्दी डाएट घेतात.

  • सकाळी इडली, डोसा, सांबार याशिवाय ड्राय फ्रूट खातात.

  • शिवाय फीट राहण्यासाठी लिंबू पाणी आणि सॉफ्ट ड्रींक घेतात.

  • लंच आणि डिनरमध्ये वरण भात भाजी पाळी खातात, त्यांना दाक्षिणात्य जेवण जास्त आवडतं.

  • शाकाहारी शिवाय मांसाहारी जेवणही त्यांना आवडते.

राहुल गांधी यांचे नेटवर्थ

गांधी परिवारातील असल्याने राहुल गांधींची गणना श्रीमंत राजकारण्यांमध्ये केली जाते. पण त्यांनी घोषित केलेल्या प्रतिज्ञापत्रकानुसार राहुल गांधीचं नेटवर्थ साधारण १६ कोटी रुपये आहे. मीडिया रिपोर्टनुसार राहुल गांधी महिन्याला १० लाख रुपये आणि वर्षाला एक कोटी रुपये कमवतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vanraj Andekar vs Govind Komkar: नाना पेठेत थरार! वर्षभरानंतर बदला घेतला, नेमकं काय होतं वनराज आंदेकर प्रकरण?

Bhagwant Mann health Update: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती खालावली ; मोहालीतील फोर्टिस रुग्णालयात दाखल!

Pro Kabaddi: बेंगळुरू बुल्सची बत्तीगुल! यू मुंबाचा ४८-२८ ने एकतर्फी विजय; अजित चौहान ठरला सामन्याचा हिरो

Mira Bhayandar: पाच हजार कोटींचं ड्रग्ज जप्त, मीरा भाईंदर पोलिसांची मोठी कारवाई

Pune Crime: वनराज आंदेकरांच्या खुनाचा बदला! गोविंदा कोमकरची तीन गोळ्या झाडून हत्या; पुणं हादरलं

SCROLL FOR NEXT