Rahul Gandhi News Sakal
देश

Rahul Gandhi : वातावरण विरोधात आहे, रणनीती काय असेल? राहुल गांधींनी पुन्हा ठणकावून सांगितलं....

पंतप्रधान अदानींबद्दलच्या माझ्या पुढच्या भाषणाला घाबरत आहे, असंही राहुल गांधी म्हणाले.

सकाळ डिजिटल टीम

Rahul Gandhi News : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी काल रद्द करण्यात आली आहे. आता त्यांची पुढची भूमिका काय असेल, रणनीती काय असेल, या बद्दल राहुल गांधी यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. आपण दुसरा कोणताच मार्ग घेणार नाही, असंही ते म्हणाले आहेत.

मी कोणताही दुसरा मार्ग शोधणार नाही. ही माझी तपस्या आहे, माझ्या जीवनातली तपस्या आहे. मला हाणा, मारा काहीही करा. या देशाने मला सगळं काही दिलं आहे, प्रेम, सन्मान दिला आहे, म्हणून मी हे करत आहे, असंही राहुल गांधी पुढे म्हणाले आहेत.

राहुल गांधी यांनी आपली खासदारकी रद्द झाल्यानंतर पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना आता पुढची भूमिका काय असेल, याबद्दल बोलताना ते म्हणाले," त्यांनी खासदारकी रद्द करो, मला मारो, काहीही असेल तरीही मी फक्त सत्य पाहतो. मला इतर कोणत्याही गोष्टीत रस नाही. हे माझ्या रक्तात आहे.

२० हजार कोटींची चौकशी व्हायला हवी

मी फक्त एकच प्रश्न विचारतो की अदानी यांच्याकडे २० हजार कोटी रुपये कुठून आले? ते पैसे त्यांचे नाहीत, त्यांना कुणीतरी दिले आहेत. त्या २० हजार कोटींची चौकशी करायला हवी. पंतप्रधान मोदी अदानींना का वाचवत आहेत? अदानी भ्रष्ट आहेत, हे जनता जाणते. जे चुकलेत ते दुसऱ्याचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत आहेत, असंही राहुल गांधी पुढे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: जंगलावर कुणाचा डोळा? CJI Suryakant यांच्या संतापानंतर राज्य सरकार अडचणीत, वनजमिनीवर हात टाकणाऱ्यांची आता खैर नाही?

Gold Price Today : सोने सलग दुसऱ्या दिवशी महागले, नव्या वर्षात नवा उच्चांक गाठणार, जाणून घ्या तुमच्या शहरात आज काय आहे भाव?

Silver Price Hike : चांदीच्या दरात दहा हजार रुपयांची, दरवाढ कमी होणार नाही तज्ज्ञांचा अंदाज

पोलीस अधिकारी असून माझी ८ कोटींची फसवणूक झाली, माजी IPS अधिकाऱ्यानं स्वत:वर झाडून घेतली गोळी

Latest Marathi News Live Update : कंबोडियात किडनी विक्रीसाठी प्रवृत्त करणारा एजंट 'डॉ. कृष्णा' पोलिसांच्या ताब्यात

SCROLL FOR NEXT