Rahul Gandhi 
देश

Kerala : स्नेक बोट रेसमध्ये राहुल गांधींनी घेतला सहभाग; पाहा थरारक व्हिडिओ

या बोटवरील अनेकांच्या गर्दीत राहुल गांधी ही बोट वल्हवताना दिसले. याचा व्हिडिओ व्हायरलं झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

थिरुवअनंतपुरम : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सध्या भारत जोडो यात्रा सुरु आहे. केरळ ते जम्मू-काश्मीर अशी ही यात्रा चालणार आहे. दरम्यान, विविध ठिकाणी कार्यक्रम घेत राहुल गांधी लोकांचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. नुकतंच त्यांनी केरळमध्ये एका स्नेक बोटच्या रेसमध्ये सहभाग नोंदवला. या बोटवरील अनेकांच्या गर्दीत राहुल गांधी ही बोट वल्हवताना दिसले. याचा व्हिडिओ व्हायरलं झाला आहे. (Rahul Gandhi participates in a snake boat race exhibition in Punnamada lake of Kerala)

स्नेक बोट रेस हा केरळमधील एक थरारक पारंपारिक खेळ आहे. लांबलचक अशा कयाक बोटमध्ये अनेक जण ही बोट वल्हवत या रेसमध्ये सहभाग घेतात. या रेसच्या वेगाचा थरार राहुल गांधींनी देखील अनुभवला. अनेकांच्या गर्दीत राहुल गांधी जोर लावून बोट वलव्हताना दिसले. पुन्नामदा लेकमध्ये हा स्नेक बोटचा थरार रंगला होता.

या बोटमध्ये राहुल गांधी यांच्यासोबत त्यांच्या टीममधील काही काँग्रेस नेते देखील सहभागी झाले होते. तीन बोटमध्ये रंगलेली ही रेस रोमहर्षक झाली विशेष म्हणजे राहुल गांधींची बोट यामध्ये विजयी झाली. त्यामुळं त्यांच्या चेहऱ्यावर रेस जिंकल्याचा आनंदही दिसत होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US OPT Fee : अमेरिकेत शिक्षणानंतर नोकरी करण्याचा मार्ग महागणार? द्यावे लागणार एक कोटींचे OPT शुल्क, भारतीय विद्यार्थ्यांवर मोठा परिणाम

Eknath Shinde Dare Village : शिवसेना पक्ष-धनुष्यबाण चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असतानाच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट दरे गावात दाखल

IND VS AFG 3RD T20I: अभिषेक शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड अन् टीम इंडियाचा धावांचा एव्हरेस्ट! संजू सॅमसनची सलग फिफ्टी...

Elderly Doctor Cheated: वृद्ध महिलेच्या देखभालीच्या बहाण्याने दोन कोटींची फसवणूक

Latest Marathi News Update : महाराष्ट्रासह देशभरातील आजच्या ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT