rahul gandhi pm narendra modi sakal
देश

Rahul Gandhi : राहुल गांधींना झालेल्या शिक्षेमुळे विरोधकांची एकजूट; काँग्रेस नेत्याचा दावा

रवींद्र देशमुख

नवी दिल्ली - लोकसभेचे खासदार आणि काँग्रेस नेते शशी थरूर यांनी विरोधकांच्या ऐक्याबाबत वक्तव्य केलं आहे. विरोधकांच्या ऐक्याच्या एक्याचं स्वागत करताना ते म्हणाले की, काँग्रेस इतर पक्षांसाठी केंद्रबिंदू राहील, परंतु जर ते पक्षनेतृत्वात असते तर त्यांनी 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला टक्कर देण्यासाठी विरोधी आघाडी उभारण्यास अधिक कष्ट घेतले असते.

काँग्रेस नेते शशी थरूर यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे की, 2019 च्या मानहानी प्रकरणात दोषी ठरल्यानंतर राहुल गांधी यांना लोकसभेतून अपात्र ठरविण्यात आल्याने विरोधकांच्या एकतेची आश्चर्यकारक लाट निर्माण झाली आहे. ऐक्य आपल्याला मजबूत बनवते आणि विभाजन आपल्याला कमकुवत करते, याचे महत्त्व अनेक विरोधी पक्षांना समजू लागले आहे. बहुतांश विरोधी पक्षांनी एकत्र येऊन एकमेकांची मते कापणे बंद करण्याचे नियोजन केले तर २०२४ च्या निवडणुकीत भाजपला बहुमत मिळणे कठीण होऊ शकते, असही थरूर यांनी म्हटलं.

काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी राहुल गांधी यांना लोकसभा सदस्यत्व अपात्र ठरविल्याची दखल घेतल्याबद्दल जर्मनीचे आभार मानणाऱ्या ट्विटबाबत विचारले असता थरूर म्हणाले की, मी असतो तर आपल्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्याला तसे न बोलण्याचा सल्ला दिला असता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Highway Accident : महामार्गावर ट्रॅव्हल अन् ‘ट्रेलर’चा भीषण अपघात; सहा जणांचा जागीच मृत्यू, अनेकजण जखमी

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न

ठरलं तर मगची घसरण कायम पण तू हि रे माझा मितवाने गड राखला ; जाणून घ्या या आठवड्याचा टीआरपी

Bhiwandi: भिवंडी महापालिकेत बदलींचा धडाका, कामगार संघटनांची तीव्र नाराजी; कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी

Jyotiba Temple : २५९ कोटींचा विकास आराखडा; जोतिबा-यमाई मंदिराचा होणार भव्य कायापालट

SCROLL FOR NEXT