rahul gandhi said 40 lakh indians died due to negligence of the government during corona  Sakal
देश

"सरकारच्या निष्काळजीपणामुळे कोरोना काळात 40 लाख भारतीयांचा मृत्यू"

सकाळ डिजिटल टीम

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रविवारी असा दावा केला की, सरकारच्या निष्काळजीपणामुळे कोरोनाव्हायरस साथीच्या आजारादरम्यान 40 लाख भारतीयांचा मृत्यू झाला. यासह राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा सर्व मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपयांची भरपाई द्यावी, अशी मागणी केली. ट्विटरवर, राहुल गांधी यांनी न्यूयॉर्क टाइम्सच्या अहवालाचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे, ज्यात दावा केला आहे की भारत कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या सार्वजनिक करण्याबाबत डब्ल्यूएचओकडून केल्या जाणाऱ्या प्रयत्नांमध्ये अडकाठी करत आहे.

राहुल गांधी म्हणाले, "मोदीजी खरे बोलत नाहीत आणि इतरांना बोलू देत नाहीत, तरीही ते खोटे बोलतात की ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे कोणीही मरण पावले नाही!" काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी पुढे म्हणाले, "मी यापूर्वीही सांगितले आहे. कोविडच्या काळात सरकारच्या दुर्लक्षामुळे पाच लाख नाही तर 40 लाख भारतीयांचा मृत्यू झाला. मोदीजी तुमची जबाबदारी पार पाडा - प्रत्येक पीडित कुटुंबाला प्रत्येकी 4 लाख रुपयांची भरपाई द्या."

भारताने शनिवारी देशातील कोरोना मृत्यू दराचा अंदाज लावण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि असे म्हटले की, अशा गणितीय मॉडेलिंगचा वापर भौगोलिक आकार आणि लोकसंख्येच्या इतक्या विशाल देशात मृत्यूच्या आकडेवारीचा अंदाज लावण्यासाठी केला जाऊ शकत नाही. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने 16 एप्रिल रोजी 'इंडिया इज़ स्टालिंग डब्लूएचओज़ एफर्ट्स टू मेक ग्लोबल कोविड डेथ टोल पब्लिक' या शीर्षकाखाली लिहिण्यात आलेल्या लेखाच्या उत्तरात एक निवेदन जारी केले होते.

त्या निवेदणात म्हटले आहे की देशाने अनेक प्रसंगी वापरल्या जाणार्‍या कार्यपद्धतीबद्दल जागतिक आरोग्य संस्थेला आपल्या अडचणी सांगितल्या आहेत. सरकारने कोरोना मृत्यूची वास्तविक आकडेवारी जाहीर केली नसल्याचा आरोप काँग्रेसने केला असून मृतांच्या कुटुंबीयांना 4 लाख रुपयांची भरपाई देण्याची मागणी केली आहे. रविवारी अपडेट झालेल्या केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, चार नवीन मृत्यूंसह कोविडमुळे मृतांची संख्या 5,21,751 वर पोहोचली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT