Rahul Gandhi 
देश

Rahul Gandhi : भ्रष्टाचारावर तडजोड होणार नाही; कर्नाटकमधील मंत्र्यांसोबतच्या बैठकीत राहुल गांधींची भूमिका

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - कर्नाटकमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला दणदणीत विजय मिळाला. पक्षाच्या वतीने राज्याच्या स्थितीबाबत बुधवारी बैठक झाली. या बैठकीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधीही सहभागी झाले होते. भ्रष्टाचाराच्या विरोधातच विजय झाला असल्याने नेत्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप टाळावेत, असं राहुल गांधी यांनी राज्य सरकारच्या मंत्र्यांना सूचित केले.

भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असं राहुल गांधी म्हणाले. जनतेला दिलेली आश्वासने कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करायची, अशाही सूचना त्यांनी दिल्या. तसेच 2024 च्या विजयासाठी प्रत्येकाची जबाबदारी निश्चित केली जाईल, ज्या भागात जबाबदारी देण्यात आली आहे, त्याच्यावर त्या भागातील विजयी कामगिरीची जबाबदारी असेल, असही स्पष्ट करण्यात आलं.

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, 2024 मध्येही कर्नाटकच्या यशाची पुनरावृत्ती करावी लागेल. शिवाय खरगे यांनी ट्विट केले की, आम्ही ६.५ कोटी कन्नडिगांसाठी प्रगती आणि कल्याणाचा नवा अध्याय लिहित आहोत. आम्ही आमच्या ५ आश्वासनांच्या पूर्ततेसाठी अथक प्रयत्न करत आहोत.

एक ऐतिहासिक जनादेश, आपल्यासोबत एक मोठी जबाबदारीही घेऊन येतो. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत कर्नाटकातील लोकही काँग्रेस पक्षावर विश्वास दाखवतील असा आम्हाला विश्वास असल्याचं खरगेंनी नमूद केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जीएसटीच्या नियमांमध्ये होणार मोठा बदल, आता विक्रेत्याच्या चुकीची शिक्षा खरेदीदाराला नाही, विधी समितीने 'त्या' प्रस्तावाला दिली मंजुरी

Kothrud Assault: कोथरूडमध्ये जुन्या वादातून तरुणावर स्टंपने बेदम मारहाण; मध्यस्थ नागरिकांनाही धमक्या

Latest Marathi News Update: सटाण्यात रोटरी क्लबचा पदग्रहण सोहळा उत्साहात

Marathi Books: इतिहास, कविता, धर्म आणि काश्मीर सफर; चार नवी पुस्तके.. वाचनविश्वात नव्या पानांची भर

गडचिरोलीत पुन्हा माओवादी हालचालींची चाहूल? कुंडमजवळ बॅनर-पत्रके आढळली; नेमकं काय लिहिलंय?

SCROLL FOR NEXT