Modi should protect country Rahul Gandhi criticism regarding China 
देश

लडाखमध्ये युक्रेनसारखी परिस्थिती; राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका

राहुल गांधी सध्या लंडनमध्ये आहेत. तिथल्या एका कार्यक्रमातून त्यांनी पंतप्रधान मोदी आणि मोदी सरकारवर सडकून टीका केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

राहुल गांधी सध्या लंडनमध्ये आहेत. त्यांनी तिथल्या एका कार्यक्रमात भारतातल्या केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे. राहुल गांधींनी भारताची तुलना पाकिस्तानशी केली आहे. तसंच पंतप्रधान मोदी कोणाचंच ऐकत नाहीत, असंही ते म्हणाले आहेत. (Rahul Gandhi in London)

लंडनमध्ये आयोजित केलेल्या एका परिषदेत बोलताना राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. आयडिया ऑफ इंडिया या कार्यक्रमात राहुल गांधींनी असंही म्हटलं आहे की, भारतात माध्यमं एक बाजू घेऊन काम करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणाचंच ऐकत नाहीत. देशातली लोकशाही धोक्यात आहे, कारण संविधानिक मूल्यांवरती सातत्याने हल्ले होत आहेत.

पंतप्रधान मोदींसह भाजपावर टीका करताना राहुल गांधी म्हणाले की, भाजपाने संपूर्ण देशात केरोसिन पसरवलंय. राज्यांची शक्ती कमी करण्यासाठी ईडी आणि सीबीआयचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. भारताचा आवाज एका विचारधारेने मारून टाकला आहे. आता ही एक राष्ट्रीय वैचारिक लढाई आहे.

भारत चीन संबंधांमध्ये असलेल्या तणावावरूनही राहुल गांधींनी टीका केली आहे. ते म्हणाले की, लडाखमध्ये युक्रेनसारखी परिस्थिती आहे. चीन सीमाभागात विकासकामं करतंय आणि पंतप्रधान मोदी चीनचं नावही घ्यायला तयार नाहीयेत. राहुल गांधींच्या याच वक्तव्यांमुळे भारताचा आणि जनतेचा अपमान केला असल्याचं म्हटलं आहे. राहुल गांधींनी परदेशात जाऊन देशाला कमी लेखल्याचंही भाजपाने म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story: पहिल्यांदा IPS, पण स्वप्न IASचं! किराणा दुकानदाराच्या मुलीने दुसऱ्या प्रयत्नात कसं मिळवलं यश?

Maharashtra Budget 2026 : बळिराजा लाडका! दोन लाखांपर्यंतचे पीक कर्ज माफ, बहिणींना ओवाळणी कायम

Donald Trump Fuel Price Warning : ‘इंधन दरवाढीची फिकीर नाही’ डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट जगाला दिला इशारा

Latest Marathi News Live Update : कामठीत मोकाट कुत्र्यांचा कहर, एका दिवसात १४ नागरिकांना चावा

Maharashtra Heatwave Alert : राज्यात सूर्याचा प्रकोप! अमरावतीने ओलांडली चाळीशी; पुढील 24 तास तुमच्यासाठी का आहेत महत्त्वाचे?

SCROLL FOR NEXT