Rahul Gandhi Sakal
देश

Rahul Gandhi Security Breache : सुरक्षेतील चुकीवर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया म्हणाले, यात्रेत...

यावेळी राहुल गांधींनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.

सकाळ डिजिटल टीम

Rahul Gandhi Press Conference : भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधींची सुरक्षा भेदत एक व्यक्तीने राहुल गांधींची गळाभेट घेण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला होता.

यानंतर राहुल गांधींनी या सर्व प्ररकरणावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ते पंजाबमधील होशियारपूरमध्ये पत्रकार परिषद बोलत आहेत.

पत्रकार परिषदेदरम्यान सुरक्षेतील त्रुटींच्या वृत्तावर प्रतिक्रिया देताना राहुल गांधी म्हणाले, की "सुरक्षेत कुठे चूक झाली? मला मिठी मारायला एक व्यक्ती येत असल्याचे मला दिसले होते. मात्र, यात कुठे चूक झाली हे मला कळत नाहीये.

या यात्रेत खूप उत्साह असतो संबंधित व्यक्तीला सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तपासले होते. गळाभेट घेणारी व्यक्ती उत्साहित झाली होती यात सुरक्षेत त्रुटी असल्याचे मला वाटत नाही. यात्रेत अशा प्रकारचे प्रसंग नियमित घडत असतात असेही राहुल गांधींनी म्हटले आहे.

नेमकं काय घडलं होतं?

पंजाबमधील होशियारपूरमध्ये भारत जोडो यात्रेदरम्यान काँग्रेस खासदार राहुल गांधी पुढे जात असताना अचानक एक व्यक्ती सुरक्षा भेदत राहुल गांधींजवळ पोहोचला यावेळी त्याने राहुल गांधींची गळाभेट घेण्याचा प्रयत्न केला.

सुरक्षा भेदत संबंधित व्यक्ती अचानक राहुल गांधींच्या जवळ पोहोचल्या काहीकाळ गोंधळ निर्माण झाला होता. मात्र, राहुल गांधींनी संबंधित व्यक्तीला बाजूला केले. त्यानंतर उपस्थित सुरक्षा कर्मचाऱ्यांनी संबंधित व्यक्तीला बाहेर काढले.

अलर्ट जारी

दरम्यान, या घटनेनंतर सुरक्षा एजन्सींकडून राहुल गांधींच्या सुरक्षेबाबत अलर्ट जारी करण्यात आला आहे.

एजन्सींच्या मते राहुल गांधींच्या काश्मीरमध्ये भारत जोडो यात्रेदरम्यान मोठी चूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राहुल गांधींना काश्मीरमध्ये काही ठिकाणी न फिरण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Orange Cap : संजू सॅमसन गरजला! ख्रिस गेलचा १३ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, ऑरेंज कॅपच्या शर्यतीत निर्णायक वळण

IPL 2026 Point Table: संजू सॅमसनची मॅच विनिंग खेळी! ७ चौकार, ६ षटकारासह ८७ धावा; चेन्नई प्लेऑफच्या शर्यतीत कायम, दिल्लीचं काय?

West Bengal : ममतांचा राजीनाम्यास नकार, भाजपचा मुख्यमंत्री कसा होणार? राज्यपालांकडे काय पर्याय?

पर्वती पायथ्याला ९ वर्षीय मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न, नागरिक संतप्त; संशयिताला अटक, घटनास्थळी पोलिसांचा फौजफाटा तैनात

जुना बोरामणी नाका ‘ब्लॅक स्पॉट’! रुग्णाचे रक्ताचे नमुने घ्यायला जाताना रक्तपेढीचा कर्मचारी ठार; 1 वर्षाच्या मुलीचा 3 दिवसांपूर्वीच झाला होता वाढदिवस

SCROLL FOR NEXT