rahul gandhi 
देश

अर्णब चॅट प्रकरणावरून राहुल गांधी पहिल्यांदा बोलले

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कृषी कायद्यावरून केंद्र सरकारवर पुन्हा जोरदार टीकास्र सोडले. कृषी कायदे शेतीला उद्ध्वस्त करतील. मी या गोष्टीचा विरोध करत राहीन. जेपी नड्डा यांच्या प्रश्नांची उत्तरे देणार नाही फक्त शेतकऱ्यांच्या आणि देशाच्या प्रश्नांची उत्तरे देईन असं राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं. यावेळी अर्णब गोस्वामी यांच्या चॅट लीक प्रकरणावरूनही राहुल गांधींना प्रश्न विचारला गेला. त्यावर उत्तर देताना राहुल गांधी म्हणाले की, हे क्रिमिनल अ‌ॅक्ट आहे. 

देशाच्या सुरक्षेविषयीची अधिकृत आणि गुप्त अशी माहिती इतर व्यक्तींना कशी माहिती होऊ शकते? पंतप्रधान मोदी, संरक्षण मंत्री, गृहमंत्री आणि एअर फोर्स प्रमुख यांच्याशिवाय ती इतरांना देणं हा गुन्हा आहे. गुप्त माहिती अशी लीक झाल्यानंच भारताचं एअरक्राफ्ट त्यावेळी पाकिस्तानकडून लक्ष्य करण्यात आलं असंही राहुल गांधी यावेळी म्हणाले.

अर्णब गोस्वामीला माहिती मिळू शकते तर पाकिस्तानला सहज पोहचली असेल असंही राहुल गांधींनी म्हटलं. भारताच्या लष्करी कारवायांबद्दल अशा प्रकारे माहिती बाहेर पोहोचवली जात असेल तर या प्रकरणाची चौकशी व्हायलाच हवी. अर्णब गोस्वामींना माहिती कोणी दिली हे समजायला हवं? मोदींनी सांगितलं की, संरक्षण मंत्र्यांनी की गृहमंत्र्यांनी त्यांना सांगितलं हे आम्हाला समजायलाच हवं असं राहुल गांधींनी म्हटलं. 

रिपब्लिक टीव्हीचे एडिटर इन चीफ अर्णब गोस्वामी आणि टीव्ही रेटिंग एजन्सी BARC चे माजी CEO पार्थ दासगुप्ता यांच्या दरम्यानचे व्हॉट्सएप चॅटचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत. यामध्ये अनेक मंत्र्यांबद्दलचा उल्लेख आहे. तसंच बालाकोट एअर स्ट्राईक आधीपासूनच अर्णब गोस्वामी यांना माहिती होता, असंही चॅट यामध्ये आहे. फक्त भारतातच नाही तर याबाबतची चर्चा पाकिस्तानात देखील होत आहे. पाकिस्तान सरकारमधील केंद्रीय मंत्री चौधरी फवाद हुसैन यांनी अर्णब गोस्वामी यांच्या या व्हॉट्सऍप चॅटचा उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Students Food Poison : पुण्यात एमएमआयटी कॉलेजमध्ये दूषित पाण्यामुळे १२ विद्यार्थिनींना विषबाधा; प्रशासनाच्या निष्काळजीपणावर गंभीर आरोप

Mumbai Pollution: अत्‍याधुनिक वाहने धूळ रोखणार, अनुभवी अभियांत्रिकी संस्था, कंपन्यांकडून मागवले अर्ज

Latest Marathi News Live Update : मनमाडमध्ये आजपासून उत्तर महाराष्ट्राचे पहिल्या विभागीय विद्रोही मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात

Mumbai Vanrani: नॅशनल पार्कमधील वनराणीला पसंती, महिनाभरात ९,००० जणांची भेट; ७.५० लाखांचे उत्पन्न 

Pune District Politics: भोरमध्ये दांपत्य प्रथमच एकाच वेळी सदस्य; राष्ट्रवादीचे विक्रम खुटवड जिल्हा परिषदेला, तर तृप्ती खुटवड पंचायत समितीला विजयी!

SCROLL FOR NEXT