देश

इंदिरा गांधी पुण्यतिथी: 'त्या' नारी शक्तीचं सर्वोत्कृष्ट उदाहरण का ठरल्या?

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : भारताच्या माजी पंतप्रधान आणि 'आयरन लेडी' म्हणवल्या जाणाऱ्या इंदिरा गांधी यांची आज 37 वी पुण्यतिथी आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज शक्तीस्थळी जाऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर एक ट्विट करुन त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 1984 साली आजच्याच दिवशी एका शिख अंगरक्षकाने गोळी मारुन इंदिरा गांधींची हत्या केली होती.

राहुल गांधी यांनी म्हटलंय की, माझी आजी शेवटच्या क्षणापर्यंत निर्भयपणे देशाची सेवा करत राहिली. तिचं आयुष्य आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. स्त्री शक्तीचं सर्वोत्कृष्ट उदाहरण असलेल्या श्रीमती इंदिरा गांधी यांच्या बलिदान दिवसानिमित्त विनम्र आदरांजली.

इंदिरा गांधींच्या आठवणींना उजाळा

पुण्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेते उल्हास पवार यांनी इंदिरा गांधी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ एका प्रदर्शनाचं उद्घाटन केलं आहे. काँग्रेस पक्षातर्फे बाळासाहेब ठाकरे आर्ट गॅलरीमध्ये या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. काँग्रेस नेते अभय छाजेड हे या कार्यक्रमाचे आयोजक आहेत.

इंदिरा गांधींचे असे पाच निर्णय ज्याने बदलला भारत

  • बँकांचे राष्ट्रीयकरण

इंदिरा गांधी यांनी आपल्या कार्यकाळात बँकांचा राष्ट्रीयकरणाचा महत्त्वाचा निर्णय घेतला होता. त्यांनी 19 जुलै 1969 रोजी 14 खासगी बँकांचे राष्ट्रीयकरण केले होते. 1969 मध्ये 8261 शाखा होत्या. 2000 पर्यंत 65521 शाखा उघडल्या गेल्या. 1980 मध्ये आणखी सहा बँकांचे राष्ट्रीयकरण केलं गेलं.

  • राजा-महाराजांचे भत्ते बंद

स्वातंत्र्यापूर्वी देशात जवळपास 500 छोटी-मोठी संस्थाने होती. प्रत्येक संस्थानाला भारतात सामिल करुन घेण्यासाठी भारत सरकारद्वारे दरवर्षी राजभत्ता दिला जायचा. हा करार सरदार पटेल यांच्याद्वारे केला गेला होता. इंदिरा गांधी यांनी हा राजभत्ता रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी 1971 मध्ये संविधानमध्ये दुरुस्ती करुन ही तरतुद रद्द केली.

  • बांग्लादेशचा उदय

भारताच्या फाळणीनंतर बंगालपासून फूटून जाऊन पूर्व पाकिस्तान बनला होता. तेथील नागरिकांना अधिकार नव्हते. पूर्व पाकिस्तानमध्ये यावरुन गृहयुद्ध सुरु झालं होतं. भारताला बांग्लादेशियांच्या विनंतीनंतर या समस्येमध्ये हस्तक्षेप करावा लागला. मोठ्या राजकीय अस्थिरतेनंतर एका नव्या राष्ट्राचा उदय झाला.

  • भारताची पहिली अणुचाचणी

18 मे 1974 रोजी भारताने जगामध्ये आपली अण्वस्त्र शक्ती आजमावली. भारताने आपली पहिली अणुचाचणी पोखरणमध्ये केली. ज्यावेळी इंदिरा गांधी यांनी या परिक्षणाला स्मायलिंग बुद्धा असं नाव दिलं होतं

  • ऑपरेशन ब्लू स्टार

या ऑपरेशनला सर्वांत भीतीदायक मानलं जातं. भिंद्रनवाले आणि त्यांचे साथी स्वतंत्र 'खलिस्तान'ती मागणी करत होते. ते स्वर्ण मंदिरात लपले होते. या दहशतवाद्यांना मारण्यासाठी इंदिरा गांधी यांनी 'ऑपरेशन ब्लू स्टार' करण्याचा निर्णय घेतला. या ऑपरेशनमुळे स्वतंत्र खलिस्तानची मागणी धुडकावून लावण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पोलिस भरतीचे वेळापत्रक ठरलं! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; वयोमर्यादा संपलेल्या ‘या’ उमेदवारांना एक संधी; अर्जासाठी ४५० ते ३५० रुपये शुल्क

Donald Trump: ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वीचे अपशकुन अन् दुर्याेधनाच्या जन्माची वेळ; भारतावरचं सर्वात मोठं संकट?

Rain-Maharashtra Latest Live News Update: गडचिरोलीत पुरामुळे अडकलेले विद्यार्थी प्रशासनाच्या तत्परतेने परीक्षेसाठी दिल्ली रवाना

CM Devendra Fadnavis : डेटा, एआय व क्वांटम कॉम्प्युटिंगमुळे उत्तम मनुष्यबळ निर्माण होणार

Selu News : पुरात वाहून गेलेल्या एकाचा मृतदेह सापडला; दुसऱ्याचा शोध सुरू

SCROLL FOR NEXT