Rahul-Gandhi-Pm-Modi sakal
देश

लसीकरणाच्या मुद्यावरून राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

देशात ओमिक्रॉन बाधितांची संख्या 1270 च्या घरात पोहोचली आहे.

निनाद कुलकर्णी

नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी कोरोना लसीकरणावरून मोदी सरकारवर ट्वीट करत पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, सरकारने आश्वासन दिले होते की 2021 मध्ये सर्वांना कोरोनाचे दोन्ही डोस दिले जातील, परंतु ते पूर्ण झाले नाही. 'केंद्र सरकारने वचन दिले होते की, 2021 च्या अखेरीस नागरिकांना दोन्ही डोस पूर्ण केले जातील असे ट्वीटमध्ये म्हटले आहे.

देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रूग्ण्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून ओमिक्रॉन बाधितांची संख्या आता 1270 च्या घरात पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 23 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधून ओमिक्रॉनचे 1,270 रूग्ण नोंदवले गेले आहेत. त्यापैकी 374 रूग्ण बरे झाले आहेत. तर दुसरीकडे महाराष्ट्रात सर्वाधिक 450 ओमिक्रॉन बाधितांची नोंद करण्यात आली आहे. यानंतर दिल्लीत 320, केरळमध्ये 109 आणि गुजरातमध्ये 97 रुग्ण आढळले आहेत.

सुमारे 64 दिवसांनंतर कोरोनाच्या नवीन रुग्णांनी 16,000 चा टप्पा ओलांडला असून, भारतात कोविड-19 च्या एकूण रुग्णांची संख्या 3,48,38,804 झाली आहे. त्याच वेळी, उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 91,361 वर पोहोचली आहे. एका दिवसात 220 रुग्णांचा संसर्गामुळे मृत्यू झाला असून, मृतांची संख्या 4,81,080 झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT