rahul gandhi visits madhya pradesh mandsaur, mp government in action removed mandsaur dm and sp 
देश

मंदसोरच्या जिल्हाधिकारी, एसपींची बदली; राहुल गांधी शेतकऱ्यांच्या भेटीला

वृत्तसंस्था

मंदसोर - कर्जमाफी व शेतमालाला हमीभाव देण्याच्या मागणीतून मध्य प्रदेशातील शेतकरी आंदोलनाने उग्र रूप धारण केले असून, सहा जिल्ह्यांमध्ये आंदोलन सुरुच आहे. मंदसोरचे जिल्हाधिकारी स्वतंत्र सिंह आणि पोलिस अधीक्षक ओमप्रकाश त्रिपाठी यांची बदली करण्यात आली आहे. तर, काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांच्या भेटीसाठी मंदसोरमध्ये दाखल झाले आहेत. 

मंदसोर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी स्वतंत्र सिंह यांची बदली करण्यात आली असून, त्यांच्याजागी ओ. पी. श्रीवास्तव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर, मनोज सिंह हे नवे पोलिस अधीक्षक असणार आहेत. मंदसोर जिल्ह्यात रॅपिड एक्शन फोर्स (आरएएफ) तैनात करण्यात आली आहे. कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी मंदसोरमध्ये दाखल झाले असून, मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहेत.

मंदसोर येथे शेतकऱ्यांवर झालेल्या गोळीबारानंतर शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. या घटनेनंतर मध्य प्रदेशात एकुणच शेतकरी आंदोलन पेटले असून कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांनी वज्रमूठ धारण केली आहे. मंदसोरसह देवास, उज्जैन, भोपाळ, नीमच या जिल्ह्यांमध्येही आंदोलनाला सुरवात झाली आहे. 
 
मंदसोरचे बदली झालेले जिल्हाधिकारी स्वतंत्र सिंह बुधवारी बरखेडा पंथ भागातील मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी गेले असता प्रक्षुब्ध शेतकऱ्यांनी त्यांना रस्त्यातच अडविले. यावेळी चिडलेल्या शेतकऱ्यांच्या जमावाने जिल्हाधिकारी सिंह यांना धक्काबुक्कीही केली. या वेळी संतप्त शेतकऱ्यांना आवर घालणे कठीण असल्याचे पाहून बरखेडा पंथचे सरपंच दिनेश यांनी मानवी साखळी करून जिल्हाधिकारी सिंह यांना सुरक्षित ठिकाणी पोचविले. सिंह यांच्यासोबत मंदसोरचे पोलिस अधीक्षक ओमप्रकाश त्रिपाठीही होते. त्यांनाही शेतकऱ्यांनी धक्काबुक्की झाली. या सहाही जिल्ह्यांमध्ये कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC Test Rankings: जो रुट पुन्हा 'अव्वल', संघसहकाऱ्यालाच टाकलं मागं; शुभमन गिल - रिषभ पंतचीही क्रमवारी घसरली

'मला दगडू सारखा 'अडल्ट जोक्स' करणारा मुलगा कधी व्हायचचं नव्हतं' प्रथमेश परब स्पष्टच बोलला

Aquarius Compatibility: कुंभ राशीसाठी 'मेड फॉर इच अदर' कोण? जाणून घ्या राशीनुसार नात्याचं भविष्य

Snake Video : सायलेन्सरमध्ये लपला होता खतरनाक साप, गाडी सुरू होताच पायाला...अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल

Latest Maharashtra News Updates : महादेव मुंडे हत्या प्रकरणात वाल्मीक कराडसह मुलाचा सहभाग, विजयसिंह बाळ बांगर यांचा आरोप

SCROLL FOR NEXT