Rahul Gandhi Rahul Gandhi esakal
देश

Mumbai Terror Attack : '26/11 ला मुंबईवर हल्ला झाला, तेव्हा राहुल गांधी खरंच पार्टी करत होते का?

2008 मध्ये 26 नोव्हेंबरला मुंबईवर मोठा दहशतवादी (Mumbai Attack 2008) हल्ला झाला होता.

सकाळ डिजिटल टीम

2008 मध्ये 26 नोव्हेंबरला मुंबईवर मोठा दहशतवादी हल्ला झाला होता. यात 15 देशांतील 166 लोकांचा मृत्यू झाला.

26/11 Mumbai Terror Attack : भारतीय जनता पक्ष (BJP) आयटी सेलचे प्रभारी अमित मालवीय (Amit Malviya) यांनी 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्याच्यानिमित्तानं काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर निशाणा साधलाय. एका वृत्तपत्राची बातमी शेअर करत त्यांनी गांधींवर टीका केलीय.

आपल्या ट्विटमध्ये त्यांनी लिहिलंय, 'जेव्हा 26/11 ला मुंबईवर हल्ला झाला, तेव्हा राहुल गांधी पार्टी करत होते, हे विसरणार नाही.' असं त्यांनी नमूद केलंय. ही वर्तमानपत्राची कात्रण दरवर्षी 26/11 च्या निमित्तानं सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर केली जाते. या अहवालानुसार, मुंबईतील हल्ल्यानंतर लगेचच राहुल गांधी दिल्लीतील एका पार्टीत दिसले होते, असं नमूद आहे. मात्र, यावर राहुल गांधींनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

2008 मध्ये 26 नोव्हेंबरला मुंबईवर मोठा दहशतवादी (Mumbai Attack 2008) हल्ला झाला होता. यात 15 देशांतील 166 लोकांचा मृत्यू झाला, तर 300 हून अधिक लोक जखमी झाले. हा हल्ला भारतीय इतिहासातील सर्वात प्राणघातक हल्ला मानला जातो. त्याचवेळी 1 डिसेंबर 2008 रोजी 'मेल टुडे'वर प्रसिद्ध झालेल्या या बातमीत असं सांगण्यात आलंय, की मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या आईचे अश्रू सुकले नव्हते आणि राहुल गांधी लगेचच एका फार्महाऊसवर मित्रांसोबत पार्टी करताना दिसले. दिल्ली रिपोर्टनुसार, राहुल गांधी त्यांचा मित्र समीर शर्माच्या संगीत समारंभात गेले होते, असं बातमीत म्हंटलंय.

पाकिस्तानचे 10 दहशतवादी समुद्रामार्गे मुंबईत आले आणि त्यांनी अनेक ठिकाणी अंदाधुंद गोळीबार करून हा हल्ला केला. मुंबईतील ताजमहाल पॅलेस हॉटेल, नरिमन हाऊस, मेट्रो सिनेमा आणि छत्रपती शिवाजी टर्मिनससह अनेक ठिकाणी दहशतवाद्यांनी हल्ले केले. सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चार दिवस चकमक सुरू होती. या हल्ल्यात 18 सुरक्षा जवान शहीद झाले होते. देशभरातून या शूर शहिदांना नमन केले जात आहे.

काय म्हणाले राहुल गांधी?

मुंबई हल्ल्याच्यानिमित्तानं राहुल गांधी यांनीही ट्विट करून शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिलीय. राहुल गांधींनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलंय, सीमेवरील कठीण वातावरणात सैनिक कुटुंबापासून दूर राहून देशाचं रक्षण करतात. दहशतवादीसारख्या हल्ल्यात आपला जीव धोक्यात घालून निष्पापांना वाचवतात. हा कुटुंबाचा, गावाचा, देशाचा अभिमान आहे, असा माझ्या देशाचा तरुण आहे. 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील वीरांना विनम्र अभिवादन. जय हिंद!', असं त्यांनी ट्विट केलंय.

या हल्ल्यात भारताने अनेक शूरवीर अधिकारी गमावले

1. हेमंत करकरे (मुंबई दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख)

2. तुकाराम अंबोळे (सहाय्यक उपनिरिक्षक, मुंबई पोलीस)

3. अशोक कामटे (अ‍ॅडिशनल पोलिस कमिशनर)

4. विजय साळस्कर (वरिष्ठ पोलीस निरीक्षक), (एन्काउंटर स्पेशालिस्ट)

5. मेजर संदीप उन्नीकृष्णन - एन.एस.जी. कमांडो अधिकारी

दरम्यान अजमल कसाब या दहशतवाद्याला जिवंत पकडण्‍यात आले होते. त्‍याला 2012 च्या नोव्‍हेंबरमध्‍येच फाशी देण्‍यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

GST Slab Proposal: कररचनेत ऐतिहासिक बदल! आता जीएसटीत फक्त दोनच दर, केंद्राचा प्रस्ताव मंजूर

Explainer: 'गाझा'वर ताबा मिळवण्यासाठी इस्रायल तयार; पण २० वर्षांपूर्वी सैनिकांना माघारी बोलावण्याची आली होती वेळ

Vajrasana Benefits: जेवल्यावर लगेच करता येणारे एकमेव आसन! जाणून घ्या वज्रासनाचे जबरदस्त फायदे

Charging Port Repair Tips : मोबाइल चार्ज होत नाही? घरच्या घरी 'या' सोप्या ट्रिकने दुरुस्त करा पोर्ट, बघा एका क्लिकवर

Trump Tariff: ट्रम्प टॅरिफचा फटका अमेरिकेलाच बसला! 446 कंपन्या दिवाळखोर; बेरोजगारीही वाढली

SCROLL FOR NEXT