rahul gandhi will soon be party president says harish rawat ahead of congress poll on october 17  rahul gandhi Latest News
देश

पुन्हा राहुल गांधींच्याच गळ्यात अध्यक्षपदाची माळ, कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचे विधान

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : आज झालेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या (सीडब्ल्यूसी) बैठकीत काँग्रेस अध्यक्षपदासाठी १७ ऑक्टोबरला निवडणूक होणार असून १९ ऑक्टोबरला मतमोजणी होणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानंतर काही वेळातच पक्षाचे ज्येष्ठ नेते हरीश रावत म्हणाले की, राहुल गांधी लवकरच काँग्रेसचे अध्यक्ष होतील असे म्हटले आहे. ते म्हणाले की राहुल जी लवकरच काँग्रेसचे अध्यक्ष होतील. आम्हा सर्व कार्यकर्त्यांना आशा आहे आणि राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपद स्वीकारावे अशी विनंती करतो.

त्याचवेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांनीही राहुल गांधींनी अध्यक्ष व्हावे, असे मत व्यक्त केले आहे. खरगे म्हणाले, राहुल गांधींनी पुढाकार घेत काँग्रेसचे अध्यक्ष व्हावे, असे सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांसह माझे वैयक्तिक मत आहे. ते काँग्रेस पक्षाला संघटित करून मजबूत करू शकतात. विशेष म्हणजे 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीत पक्षाचा सलग दुसऱ्यांदा पराभव झाल्यानंतर राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.

राहुल यांच्या राजीनाम्यानंतर सोनिया गांधी यांनी हंगामी अध्यक्ष म्हणून पुन्हा पक्षाची सूत्रे हाती घेतली आहेत. परंतु G-23 नेत्यांनी केलेल्या बंडानंतर त्यांनी देखील ऑगस्ट 2020 मध्ये पायउतार होण्याची ऑफर दिली होती परंतु CWC ने त्यांना पुढे जाण्यास सांगितले.

वैद्यकीय तपासणीसाठी परदेशात असलेल्या सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी 3.30 वाजता CWCची ऑनलाइन बैठक झाली. यावेळी सोनियांसोबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी उपस्थित होते. या बैठकीला आनंद शर्मा, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, पक्षाच्या केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाचे अध्यक्ष मधुसूदन मिस्त्री, के.सी. वेणुगोपाल, माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश, मुकुल वासनिक आणि पी. चिदंबरम यांच्याशिवाय राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल हेही उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Education : विधान परिषदेत शिपायाच्या कंत्राटी पदावरून पेच; सत्ताधारी शिक्षक, पदवीधर आमदारांनीच केला सभात्याग

Ashadhi Ekadashi 2025: मुखात तुझे नाव, डोळ्यात तुझे गाव;डिगडोहमध्ये ‘विठ्ठल रखुमाईचा दर्शन सोहळा, माऊली ग्रुपचा उपक्रम

Ahilyanagar: 'श्रीरामपूरकरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्वागत'; ढोल-ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत जल्लोष

Pune Crime : सोसायट्यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर, कोंढव्यातील घटनेनंतर भीती; सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षा यंत्रणेवरही प्रश्‍नचिन्ह

Ashadhi Wari 2025:'वरुणराजाच्या साक्षीने संत भेटीचा सोहळा'; बोंडले येथे संत तुकाराम महाराज व संत सोपानदेव महाराज यांची भेट

SCROLL FOR NEXT