Rahul Gandhi 
देश

Sonia Gandhi: 'आज कळलं आजी किती बरोबर होती...; राहुल गांधींची सोनियांसाठी भावनिक पोस्ट

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - मल्लिकार्जुन खर्गे यांनी आज काँग्रेस अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला. यामुळे आता सोनिया गांधी यांना या पदावरून मुक्त करण्यात आलं आहे. सोनिया गांधी यांनी २ दशकांहून अधिक काळ पक्षाच्या केंद्रस्थानी राहून काँग्रेस पक्षाचे काम केले. (Rahul Gandhi news in Marathi)

सोनिया गांधी काँग्रेस अध्यक्षपदावरून मुक्त झाल्यानंतर खासदार राहुल गांधी यांनी केलेली पोस्ट व्हायरल झाली आहे. राहुल यांनी पोस्ट करून म्हटलं की, आजी एकदा म्हणाली होती की, तिला तुझ्यासारखी मुलगी कधीच भेटू शकणार नाही. आज कळलं, आजी किती बरोबर होती. तुझा मुलगा असल्याचा मला अभिमान आहे, असंही राहुल यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं.

सोनिया गांधी यांनी आज पदमुक्त होताना सांगितले की, सुमारे २३ वर्षे सेवा केल्यानंतर आता मला दिलासा मिळाला आहे. मी माझ्या क्षमतेनुसार माझं कर्तव्य पार पाडलं. आज मी या जबाबदारीतून मुक्त होत आहे. माझ्या खांद्यावरून एक भार कमी झाला. ही मोठी जबाबदारी होती, आता ही जबाबदारी मल्लिकार्जुन खर्गे यांच्यावर आहे.

याआधी प्रियंका गांधी यांनी देखील सोनिया यांच्यासाठी पोस्ट केली होती. प्रियांका यांनी म्हटलं होतं की, आई, आम्हाला तुझा अभिमान वाटतो. जग काय म्हणते किंवा काय विचार करते याने काही फरक पडत नाही? आम्हाला माहित आहे तु कायमच सर्वांना प्रेम दिलं. प्रियांका गांधी यांनी पोस्ट केलेल्या फोटोमध्ये 75 वर्षीय सोनिया गांधी हातात पती राजीव गांधी यांचा फोटो घेऊन उभ्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijeet Dipke MPSC : धर्म-जातीच्या नावावर मत मागता, पण शिक्षणाचं काय?’; पुण्यातील एमपीएससी आंदोलनात अभिजीत दिपकेंचा सवाल

GST Council : GSTचे नियम बदलणार? 9 गुन्हे वगळण्याचा प्रस्ताव, अटक प्रक्रियेतही मोठी सुधारणा होण्याची शक्यता

IND vs WI, Schedule: वनडे मालिका संपली, आता ५ सामन्यांची T20I मालिका होणार सुरू; संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : देश-विदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

किटलीशिवाय कप-बशी भरणार नाही; शिट्टीपासून सावध राहा; सोमेश्वर निवडणुकीत युगेंद्र पवारांचे सूचक आवाहन

SCROLL FOR NEXT