Rahul Bajaj Criticized Amit Shah Team eSakal
देश

राहुल बजाज यांनी भर कार्यक्रमात थेट अमित शहांना सुनावलं होतं

राहुल बजाज हे नेहमी खुलेपणाने राजकीय विषयांवर बोलत असत.

सुधीर काकडे

बजाज समुहाचे सर्वेसर्वा राहुल बजाज यांचं काल पुण्यात निधन झालं. शनिवारी वयाच्या ८३ व्या वर्षी पुण्यात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कर्करोगाने त्रस्त होते. त्यांच्या जाण्याची बातमी समजताच उद्योगजगतात शोककळा पसरली आहे. सोशल मीडियावर उद्योग क्षेत्रातील दिग्गज लोकांसह राजकीय मंडळीही त्यांच्या योगदानाचं स्मरण करून त्यांना आदरांजली वाहत आहेत. बजाज समुहाचे (Bajaj Automobiles) अध्यक्ष म्हणून ५० वर्ष काम करताना त्यांची ख्याती औद्योगीक क्षेत्रापूर्तीच मर्यादीत नव्हती. राहुल बजाज (Rahul Bajaj) यांनी नेहमी सामाजिक आणि राजकीय भुमिका घेतल्याचं दिसून यायचं. (Rahul Bajaj Criticized Amit Shah and BJP)

देशातील राजकीय प्रश्नांवरही राहुल बजाज खुलेपणाने मत व्यक्त करायचे. एखादा कार्यक्रम हा व्यावसायिक असला, तरी नफ्या तोट्याचा विचार न करता राहुल बजाज आपलं मत मांडायचे. 2006 ते 2010 या काळात ते राज्यसभेचे खासदारही होते. आज जेव्हा लोक त्यांना श्रद्धांजली वाहतना त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देत आहेत. तेव्हा अनेकांना त्यांचा 2019 चा तो कार्यक्रमही आठवतो, ज्यामध्ये राहुल बजाज यांनी भाजपचे तत्कालीन अध्यक्ष आणि विद्यमान गृहमंत्री अमित शहा यांना भर कार्यक्रमात सुनावलं होतं.

साध्वी प्रज्ञांवर नाव न घेता साधला होता निशणा

मुंबईतील एका खासगी कार्यक्रमात बोलताना राहुल बजाज यांनी देशातील सध्याच्या वातावरणाबद्दल आपलं मत मांडलं होतं. यावेळी त्यांनी अमित शहा यांना सुनावलं होतं. "आज लोक त्यांना देशभक्त म्हणतात... गांधीजींना ज्यांनी गोळ्या घातल्या, तुम्हालाही माहीत आहे... त्यात काहीही शंका आहे, असं मला वाटत नाही. त्यांना तुम्ही तिकीटही दिलं, त्या जिंकल्याही... ते ठीक आहे. तुमच्या पाठिंब्याने त्या जिंकल्या आहेत, त्यांना कोणीही ओळखत नव्हतं. त्यानंतर तुम्ही त्यांना संसदीय समितीमध्ये आणलं... अशा व्यक्तीला माफ करणं खूप कठीण जाईल असं पंतप्रधान म्हणाले होते. त्यानंतरही त्यांना समितीमध्ये घेण्यात आलं... ठीक आहे, नंतर त्यांना काढून टाकलं...

लिचिंग बद्दलही व्यक्त केली होती चिंता

भागवत जी म्हणतात की लिंचिंग हा एक परदेशी शब्द आहे, लिंचिंग हा शब्द पाश्चिमात्य देशांत वापरला जात होता… ही एक किरकोळ समस्या असू शकते परंतु ती वातावरण निर्माण करतेय. असहिष्णुतेच्या या वातावरणामुळ, आम्हाला भीती वाटते. आज आपण पाहतोय की, बलात्कार नाही, देशद्रोह नाही, खून नाही. मात्र तरीही लोक 100-100 दिवस तुरुंगात राहता आहेत.

काँग्रेसच्या काळात कुणावरही टीका करता येत होती, मात्र आता...

"युपीए - २ च्या काळात तुम्ही कुणालाही बोलू शकत होता, टीका करू शकत होता. तुम्ही चांगलं काम करत आहात पण आम्ही तुमच्यावर टीका केली तर तुम्ही ती सहन कराल अशी शक्यता वाटत नाही. देशातलं हे वातावरण... सर्वांना माहिती आहे. मात्र कोणीही यावर बोलणार नाही... आमचे उद्योगपती मित्रही त्यावर बोलणार नाहीत. मात्र मी खुलेपणानं बोलेल. कारण बोलता येईल असं वातावरण तयार केलं पाहिजे. माझं हे मत चूकीचं असू शकतं. मात्र आम्हा सर्वांना असं वाटतं..."

सुमारे 5 मिनिटं बजाज यांचं मत ऐकल्यानंतर अमित शहांनी त्यांना उत्तर दिलं. ते म्हणाले, 'मला वाटतं तुम्ही तुमचं मत व्यक्त केल्यानंतर तरी कोणी घाबरत असेल यावर कोणी विश्वास ठेवणार नाही. त्यानंतर ते म्हणाले होते की, कुणालाही घाबरण्याची गरज नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Heritage status: अभिमानाची बाब! शिवरायांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या यादीत समावेश

खरीप हंगामात ८१,००० शेतकऱ्यांना ११४० कोटींचे पीककर्ज! ६३ हजार ८४९ शेतकऱ्यांच्या १०३० कोटी रुपयांच्या पीककर्जाचे बॅंकांनी केले नवे-जुने

Latest Marathi News Updates: 'सीएम'पदासाठी भाजपात पक्ष विलिन करण्याची शिंदेंची तयारी - संजय राऊतांचा टोला!

IND vs ENG 3rd Test: रिषभ पंतने २५ मिनिटं नेट्समध्ये फलंदाजी केली, पण...! जाणून घ्या महत्त्वाचे अपडेट्स, Video

Pune ISIS sleeper cell: मोठी बातमी! पुणे ‘इसीस स्लीपर सेल मॉड्युल’ प्रकरणी अकरावी अटक; तीन लाखांचा होता इनाम!

SCROLL FOR NEXT