Train 
देश

Recruitment : रेल्वे विभागात मार्च 2023 पर्यंत 35 हजार पदांची भरती; डेडलाईन जाहीर

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - रेल्वेने प्रथमच आपल्या भरती परीक्षांचे निकाल जाहीर करण्यासाठी वेळापत्रकच निश्चित केले आहे. तसेच मार्च २०२३ पर्यंत यंदाच्या नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी परीक्षांमध्ये निवड झालेल्या ३५,२८१ उमेदवारांना नोकरी देण्याची मुदतही निश्चित केली आहे. (Recruitment Exam Results news in Marathi)

या निर्णयामुळे विविध टप्प्यांवर परीक्षा दिलेल्या आणि निकालाच्या प्रतीक्षेत असलेल्या एक लाखाहून अधिक उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. आरआरबी एनटीपीसी परीक्षा 2022, भारतीय रेल्वेच्या विविध विभागीय रेल्वे आणि त्यांच्या उत्पादन युनिट्ससाठी सुमारे चार वर्षांत 35,281 रिक्त जागा भरण्याचे निश्चित केले आहे.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, सप्टेंबरमध्ये लेव्हल-६ मध्ये ७,१२४ उमेदवारांचे निकाल जाहीर करण्यात आले होते, त्यांचे वैद्यकीय मूल्यमापन आणि कागदपत्रांची पडताळणी सुरू होती. 21 आरआरबींपैकी 17 जणांनी आपला अंतिम निकाल आधीच जाहीर केला आहे, तर बाकीचे लवकरच आपला निकाल जाहीर करतील.

रेल्वेने तयार केलेल्या टाइम टेबलनुसार, नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत लेव्हल-५ चा निकाल हाती येईल आणि डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत त्यांची कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय काम पूर्ण होईल. जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत त्यांची नियुक्त करण्यात येणार आहे.

हेही वाचा का आहे जैन आणि हिंदु धर्मियांत साहचर्य?

आरआरबी एनटीपीसी भरती प्रक्रिया दोन टप्प्यात होणार आहे. यामध्ये संगणक-आधारित परीक्षा, टायपिंग कौशल्य चाचणी, दस्तऐवज पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी या दोन टप्प्यांचा समावेश आहे. स्टेशन मास्तर, गुड्स गार्ड, कमर्शिअल अप्रेंटिस, तिकीट क्लार्क, ज्युनिअर अकाउंट असिस्टंट, सीनिअर क्लार्क कम टायपिस्ट आणि टाइमकीपर या पदांसाठी ही भरती केली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Mitkari: ‘भूमिपुत्रांना रोजगार द्या, त्यांचं आयुष्य समृद्ध करा’; आ. अमोल मिटकरी यांची विधान परिषदेत ठाम मागणी

Manoj Kayande : अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या; आमदार मनोज कायंदे यांची अधिवेशनात मागणी

KDMC Revenue Department : कल्याण - डोंबिवली खाडी किनारी महसूल विभागाची कारवाई; 30 लाखांचा मुद्देमाल केला नष्ट

"मृत्युपत्र तयार ठेवलंय" एअर इंडियाने प्रवास करणाऱ्या अभिनेत्याची पोस्ट व्हायरल, म्हणाला..

Latest Maharashtra News Updates : सोमनाथच्या मृत्यू संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT