Railway esakal
देश

होळीनिमित्त प्रवाशांना रेल्वे प्रशासानाकडून भेट; असे असेल वेळापत्रक

होळीच्या सणा दरम्यान प्रवासाची मागणी पूर्ण करण्यासाठी घेतला निर्णय

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : मार्च महिन्यात होळी हा सण खूप मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. उत्तर भारतीयांची होळीला गावी जाण्याची धांदल सुरु होते. भारतात कोरोना (Corona) रूग्णांच्या संख्येत घट झाल्यानंतर आता बहुतांश ठिकाणी अनलाॅक करण्यात आले आहे. त्यामुळे कोरोना कालावधीनंतर आता या सणाला खूप महत्त्व प्राप्त झाले आहे. गावी जाण्यासाठी आतापासूनच अनेकांनी ट्रेन (Railway), बस आणि विमानाची तिकिटे बुक करण्यास सुरुवात केली आहे. तर काहींनी महिना आधीच बुक केली आहेत. ऑफीस वर्क करणारे आधीच सुट्टीचे नियाजन करतात. पण रेल्वे तिकीट (Train Ticket) कन्फर्म न झाल्यामुळे तुम्हाला प्लॅन रद्द करावा लागू शकतो. यासाठी शासनाने तुमच्यासाठी खास स्पेशल रेल्वेची तरतूद केली आहे. ती नेमकी ट्रेन कोणती आहे, कोणत्या मार्गाने जाणार याविषयी जाणून घेऊया..

शासनाने तुमच्यासाठी खास स्पेशल रेल्वेची तरतूद केली आहे. ती नेमकी ट्रेन कोणती आहे, कोणत्या मार्गाने जाणार याविषयी जाणून घेऊया..

मुंबई आणि बलिया स्पेशल ट्रेन

मुंबई (Mumbai) आणि बलिया या ठिकाणाहून तुम्हाला ट्राय-वीकली स्पेशल लोकमान्य टिळक टर्मिनस (Lokmanya Tilak Terminus) ट्रेन क्रमांक ०१००१ तारीख सात ते तीस मार्चपर्यंत दर सोमवारी, बुधवार आणि शुक्रवारी सुटेल. तर ट्रेन क्रमांक ०१००२ ट्राय-साप्ताहिक विशेष गाडी ९ मार्च ते १ एप्रिल या कालावधीत दर बुधवार, शुक्रवार आणि रविवारी बलिया येथून सुटेल.

काय असेल सुविधा

या गाड्यांमध्ये एक एसी टू टायर, सहा एसी थ्री टायर, ११ स्लीपर क्लास आणि पाच जनरल सेकंड क्लास डबे असतील. तसेच कल्याण, नाशिकरोड, भुसावळ, हरदा, इटारसी, राणी कमलापती, बिना, ललितपूर, टिकमगढ, खरगपूर, छतरपूर, खजुराहो, महोबा, बांदा, चित्रकूटधाम कारवी, माणिकपूर, प्रयागराज, ज्ञानपूर रोड, वाराणसी, मसूर, ए. आणि रासरा असा थांबा असेल.

मुंबई सेंट्रल आणि वांद्रे टर्मिनस यांचा निर्णय

होळीच्या सणादरम्यान प्रवासाची मागणी पूर्ण करण्यासाठी पश्चिम रेल्वेने मुंबई सेंट्रल आणि वांद्रे टर्मिनस येथून विशेष भाड्यावर होळी स्पेशल सुपरफास्ट ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत पश्चिम रेल्वेच्या अधिकृत ट्विटरवरून अकौंटवर ट्विट केले आहे. २ मार्च पासून बुकिंग करण्यासाठी PRS काउंटर आणि IRCTC वेबसाइटवर करू शकता. यामध्ये ०९०३९,०९०३५,आणि ०९००६ या गाडींचे तुम्ही बुकिंग करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: राहुल गांधींना किस केलं, सुरक्षा रक्षकानं तरुणाला पकडलं अन्...; बाईक रॅलीतील व्हिडिओ व्हायरल

Whatsapp Call Feature : इंटरनेट, नेटवर्क नसतानाही व्हॉट्सअ‍ॅप कॉल करता येणार, ते कसे? पाहा एका क्लिकवर

Video : ₹2,500,000,000 मध्ये बनलेल्या रणबीर-आलियाच्या आलिशान घराची झलक समोर ! असं आहे घराचं इंटिरियर

सोनी BBC अर्थने धर्मेश बरई यांचा ‘अर्थ चॅम्पियन’ म्हणून गौरव केला

Manoj Jarange : सरकारच काय, सरकारचा बाप जरी आला तरी आरक्षण घेणार, तेही ओबीसीतूनच....मनोज जरांगेंचा निर्धार

SCROLL FOR NEXT