Isolation coches 
देश

कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी रेल्वे पुन्हा सज्ज; उपलब्ध करुन देणार आयसोलेशन कोचेस

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : देशात पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक झाला असून महाराष्ट्रासह काही राज्यांमधील स्थिती बिघडत चालली आहे. रुग्णालयांमध्ये बेडही मिळेनासे झाले आहेत. या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेने गेल्या वर्षीप्रमाणं आत्ताही मदतीसाठी तयारी दर्शवली आहे. ज्या राज्यांकडे रुग्णांच्या आयसोलेशनसाठी बेड उपलब्ध नसतील त्यांना रेल्वेचे कोचेस उपलब्ध करुन देण्यात येतील असं रेल्वेनं म्हटलं आहे. 

"पश्चिम रेल्वेकडे सध्या ३८६ आयसोलेशन कोचेस उपलब्ध आहेत. यांपैकी १२८ कोचेस हे मुंबई डिव्हिजनमध्ये आहेत. जर कुठल्या राज्यांना या आयसोलेशन कोचेसची मागणी नोंदवल्यास त्यांना ते उपलब्ध करुन देण्यात येतील," अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली. 

एकाच वेळी तीन हजारहून अधिक रुग्णांची सोय

या सर्व कोचेसमध्ये मिळून एकाच वेळी ३,६०० रुग्णांना आयसोलेशनमध्ये ठेवता येऊ शकतं. मेडिकल ऑक्सिजनसह हे कोचेस उपलब्ध असून प्रत्येक कोचमध्ये जवळपास २४ रुग्णांची सोय होऊ शकते. ज्या रुग्णांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणं आहेत अशांना ही कोचेस वापरासाठी दिली जातात.

पुण्यात रेमडेसिव्हिरसाठी 'कोन्ट्रोल रुम'; गरजूंना टोल फ्री क्रमांकावर संपर्काचं आवाहन
कोविड-१९च्या रुग्णांसाठी भारतीय रेल्वेनं गेल्या वर्षी ५,००० हून अधिक रेल्वे कोचेसचं रुपांतर आयसोलेशन युनिटमध्ये केलं होतं. यांपैकी ८०० कोचेस मध्य आणि पश्चिम रेल्वे विभागांसाठी देण्यात आली होती. या कोचेसचा गेल्यावर्षी महाराष्ट्रात वापर झाला नव्हता. त्यामुळे ते उत्तर प्रदेश आणि तेलंगाणा या राज्यांना देण्यात आले होते. राज्य सरकारच्या मागणीनंतरच रेल्वेचे हे कोच पाठवले जातात, असं रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. 

कौतुकास्पद! महाराष्ट्रात सर्वप्रथम 1 कोटी लसीकरणाचा टप्पा पार

या प्रत्येक कोचचं आयसोलेशनमध्ये रुपांतर करण्यासाठी २ लाख रुपये खर्च आला होता. त्यानंतर ज्या रेल्वे स्थानकांतून कुठलीही रेल्वे जाणार नव्हती अशा काही ठराविक रेल्वे स्थानकांमध्ये हे कोच ठेवण्यात आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Price: महत्त्वाची बातमी! पेट्रोलचे दर वाढले; वाहनधारकांना मोठा फटका, नवे दर किती? जाणून घ्या...

Mayor: इटालियन फ्लोअरिंग, कौलारू छत, विशेष रूम अन्...; BMC च्या महापौर बंगल्याचा कायापालट होणार, कोणते बदल आणि खर्च किती?

'अगं अगं सुनबाई..' नंतर केदार आणि सना शिंदे यांचा नवा सिनेमा ‘आई भाड्याने हवी?’

Pune Fraud News : पाणी व्यवसायाच्या नावाखाली बाप-लेकांकडून दोन कोटी ३४ लाखांची फसवणूक; बाप-लेकांवर गुन्हा दाखल

वन डे वर्ल्ड कप २०२७ साठी BCCI ने २० खेळाडू आधीच निवडलेत? IPL 2026 मध्ये त्यांच्यावर निवड समितीचे लक्ष

SCROLL FOR NEXT