Dark clouds and rainfall visuals represent the rain alert across five Indian states, while foggy conditions indicate intensifying cold wave during New Year’s Eve.

 

esakal

देश

Rain Alert : नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येस पाच राज्यांमध्ये पावसाचा इशारा; थंडीचा कडाका आणखी वाढणार!

Rain Alert Issued for Five Indian States : १५ हून अधिक प्रमुख शहरांसाठी दाट धुक्याचा इशारा जारी करण्यात आला आहे; जाणून घ्या, नेमकी कोणती राज्ये आहेत?

Mayur Ratnaparkhe

Rain alert issued in five Indian states on New Year’s Eve : नवीन वर्षाचे आगमन होत आहे. मात्र तत्पुर्वी हवामान विभागाने पाच राज्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवला आहे. यामुळे नवीन वर्षांची मजा काहीशी बिघडू शकते, अशी शक्यता आहे. नवीन वर्षाच्या एक दिवस आधी देशाच्या उत्तर आणि दक्षिण भागात हवामान बिघडण्याची शक्यता आहे.

या पावसानंतर अनेक राज्यांमध्ये कमाल तापमान ३ ते ४ अंशांनी कमी होईल. या काळात लोकांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे. १५ हून अधिक प्रमुख शहरांसाठी दाट धुक्याचा इशारा जारी करण्यात आला आहे.

हवामान खात्यानुसार, ३१ डिसेंबरच्या संध्याकाळपासून उत्तर भारतातील पाच राज्यांमध्ये हवामान बिघडण्याची शक्यता आहे. दिल्ली, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, काश्मीर आणि हरियाणा येथे पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे. पावसानंतर या राज्यांमधील तापमानात ३ ते ४ अंशांनी घट होऊ शकते, ज्यामुळे थंडी वाढू शकते.

हवामान खात्याच्या मते, पुढील तीन दिवस तामिळनाडूच्या अनेक भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. मच्छिमारांसाठी विशेष इशारा जारी करण्यात आला आहे आणि त्यांना समुद्रात जाण्यास मनाई करण्यात आली आहे. याशिवाय,  ३० डिसेंबरपासून दिल्लीत आकाश ढगाळ होऊ शकते. तर, ३१ डिसेंबरपासून हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे. या पावसामुळे थंडीची तीव्रता देखील वाढणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Election: पुण्यात निवडणुकीचा नवा पॅटर्न; 'हे' तीन पक्ष एकत्रित निवडणूक लढवणार

Video: धुरंधरच्या गाण्यावर पाकिस्तानी महिला पोलिसाचा तुफान डान्स; वर्दीवरचा व्हिडीओ व्हायरल

BMC Election: स्थगितीच्या सावलीत उमेदवारी! उघड नाराजी, तरी बॅकडोअर एन्ट्री! भाजपचा थरवळांसाठी खास डाव

BMC Election: 'आश्वासनं फसवी ठरली...'! डबेवाला संघटनेची उद्धव ठाकरेंवर नाराजी; महायुतीला पाठिंबा देत सत्ता बदलाचा इशारा

Latest Marathi News Live Update : ४२ लाखांहून अधिक बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई

SCROLL FOR NEXT