Cow esakal
देश

Video Viral करुन वासनांध हैवानांचा गायीवर बलात्कार; 4 नराधमांना अटक

सकाळ डिजिटल टीम

या घटनेचा सामाजिक संघटनांकडून तीव्र शब्दांत निषेध नोंदवण्यात येत आहे.

भिवाडी, अलवरमध्ये (Bhiwadi, Alwar) तीन दिवसांपूर्वी एका गायीवर (Cow) अत्याचार केल्याचा व्हिडिओ व्हायरल (Video Viral) झाल्यानंतर पोलीस दलात खळबळ उडालीय. भिवाडी पोलीस अधीक्षकांच्या सूचनेवरून, पोलिसांनी एक पथक तयार करून चार आरोपींना अटक केलीय. तसेच अटकेत असलेल्या आरोपींची चौकशी सुरु असून या कृत्यात आणखी कोणाचा हात आहे का? याचाही शोध पोलीस घेत आहेत.

गोपालक फतेह मोहम्मद (Fateh Mohammad) यांनी पोलिसांना सांगितलं की, चुहारपूरच्या जंगलात (Chuharpur Forest) ते गुरे चारण्यासाठी गेले होते. तेथून गावी परतत असताना त्यांच्याच गावातील काही लोकांनी एका गायीला दोरीनं बांधून तिच्यासोबत चुकीचं कृत्य केल्याचं त्यांनी पाहिलं. फतेह मोहम्मद यांनी प्रतिकार केला असता, त्यांना जीवे मारण्याची धमकी देऊन तेथून आरोपींनी पळ काढला. या घटनेचा व्हिडिओही आरोपींनी व्हायरल केला होता.

या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केलीय. पोलिस अधीक्षक शंतनू कुमार यांच्या निर्देशानुसार, चोपंकी पोलीस स्टेशनच्या (Chopanki Police Station) पोलिस पथकानं 4 आरोपींना अटक केली असून इतर आरोपींनाही पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये जुबेर (वय 21), चुन्ना उर्फ ​​तारीफ (वय 20), तालीम आणि वारिस यांचा समावेश आहे. सर्व आरोपी चोपंकी, भिवाडी येथील रहिवासी आहेत. दरम्यान, पोलिसांपासून वाचण्यासाठी सर्व आरोपी आपल्या नातेवाईकांसह मेवात, हरियाणात लपून बसले होते. मात्र, पोलिसांनी तत्परतेनं चारही आरोपींना अटक केलीय. या घटनेचा सामाजिक संघटनांकडून तीव्र शब्दांत निषेध नोंदवण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pappu Yadav: पत्रकार परिषदेतच मोठी घटना! खासदार पप्पू यादवांवर चाकुहल्ला; घटनेनं खळबळ, नेमकं काय घडलं?

IND vs SL : टीम इंडियासाठी श्रीलंका दौऱ्यातील प्लॅन ऐनवेळी बदलला! ४ दिवसांचा सामना ३ दिवसांतच संपणार

Road Protest: कनेरसर–पूर–पाबळ रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात ग्रामस्थांचे आंदोलन; अपघातानंतर तातडीच्या दुरुस्तीची एकमुखी मागणी

Flipkart वरून फूड डिलिव्हरी कधी सुरु होणार? Zomato-Swiggy ला टक्कर देण्यासाठी कंपनीची खास रणनीती

Goa Foreign Liquor: डिकसळ येथे गोव्यातील प्रतिबंधित विदेशी मद्याचा 7.89 लाखांचा साठा जप्त; राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT