Rajasthan Election Esakal
देश

Rajasthan Election: काँग्रेसची सावध रणनीती! अशोक गेहलोत, सचिन पायलट यांचा पहिल्या यादीत समावेश; दसऱ्यानंतर दुसरी यादी

काँग्रेसच्या पहिल्या यादीत गेहलोत आणि सीपी जोशी हे सर्वात जुने उमेदवार

सकाळ वृत्तसेवा

काँग्रेसने राजस्थानसाठी पहिली ३३ उमेदवारांची यादी जाहीर केली. परंतु यात हमखास निवडून येणाऱ्या आणि ज्या मतदारसंघात फारसा पेच नाही, अशा उमेदवारांची नावे जाहीर करून सावध वाटचाल करीत असल्याचे काँग्रेसने स्पष्ट केले. या यादीत मुख्यमंत्री अशोक गहलोत, माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट, राजस्थानचे प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंग डोटसारा, विधानसभेचे अध्यक्ष सी. पी. जोशी यांचा प्रामुख्याने समावेश केला आहे.

काँग्रेसने आज पहिली केवळ ३३ जणांची यादी जाहीर केली आहे. याउलट भाजपने आतापर्यंत १२४ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. काँग्रेसने उमेदवार जाहीर करताना कोणताही धोका पत्करलेला दिसत नाही. हमखासपणे निवडून येणाऱ्या उमेदवारांची यादी जाहीर करून काँग्रेसने सुरक्षित खेळी खेळली आहे.

या यादीचे वैशिष्ट्ये म्हणजे काँग्रेसने पहिल्याच यादीत मुख्यमंत्री अशोक गहलोत यांना त्यांचा पारंपारिक सरदारपुरा मतदारसंघातून उमेदवारी दिली. सचिन पायलट यांना त्यांच्या टोंक मतदारसंघातून मैदानात उतरविले आहे.

प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंग डोटसारा यांना लक्ष्मणगड मतदारसंघातून उमेदवारी दिली. विधानसभेचे अध्यक्ष सी. पी. जोशी यांना नाथद्वारातून उमेदवारी दिली. या मतदारसंघातून भाजपने राजघराण्यातील कुंवर विश्वराज सिंग मेवाड यांना उमेदवारी दिली आहे.

आठ महिलांना उमेदवारी

यादीत काँग्रेसने ८ महिलांना उमेदवारी दिली. यात ऑलिंपिकपटू कृष्णा पुनिया यांना सादुलपुरा मतदारसंघातून, भारत जोडो यात्रेत प्रसिद्धीस आलेल्या दिव्या मदेरना यांना ओसियन मतदारसंघातून उतरविले. मंडावा मतदारसंघातून रिता चौधरी यांना उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघातून भाजपचे खासदार नरेंद्र कुमार रिंगणात आहेत.

सवाई माधोपूर मतदारसंघातून भाजपचे खासदार डॉ. किरोडीलाल मीणा यांच्या विरोधात काँग्रेसने दानिश अब्रार यांना उमेदवारी दिली आहे. या यादीत पक्षश्रेष्ठींवर वादग्रस्त विधान करणारे व मुख्यमंत्री गहलोत यांचे निष्ठावान मंत्री शांतिलाल धारिवाल यांना स्थान मिळाले नाही.

दसऱ्यानंतर दुसरी यादी

हमखास निवडून येणाऱ्या उमेदवारांची यादी काँग्रेसने जाहीर केली आहे. आता केंद्रीय निवडणूक समितीची बैठक दसऱ्यानंतर होण्याची शक्यता आहे. यानंतरच दुसरी यादी जाहीर होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

SCROLL FOR NEXT